The stream where the child was swept away. esakal
जळगाव

Jalgaon News : नाल्यातून चेंडू काढताना सहावर्षीय बालक गेला वाहून; पोलिसांकडून शोध सुरू

Jalgaon : नाल्यात पडलेला चेंडू घेण्यासाठी वाहत्या पाण्यात उतरलेला बालक वाहून गेल्याची घटना शनिवारी (ता. ६) दुपारी घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील खंडेरावनगराजवळील आरएमएस कॉलनीसमोरील नाल्यात पडलेला चेंडू घेण्यासाठी वाहत्या पाण्यात उतरलेला बालक वाहून गेल्याची घटना शनिवारी (ता. ६) दुपारी घडली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, बालकाचा शोध घेत आहेत. सचिन राहुल पवार (वय ६, रा. हरिविठ्ठलनगर, नवनाथ मंदिराजवळ, जळगाव, मुळ रा. कुसुंबा ,ता. रावेर) असे बेपत्ता बालकाचे नाव आहे. (six year old boy got carried away while removing ball from drain )

हरिविठ्ठलनगरात राहुल किसन पवार (वय ३२) मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास खंडेरावनगर परिसरात सचिन पवार त्याची १० वर्षांची बहीण आणि परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेला होते. तेथे चेंडू सापडल्याने ते चेंडू खेळू होते. खेळताना अचानक चेंडू जवळच्या नाल्यात पडला. नाल्यातून चेंडू काढण्यासाठी सचिन पवार नाल्यात उतरला. मात्र, नुकताच पाऊस पडल्याने व नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने सचिनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.

त्याच्या सोबतच्या लहान मुलांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी धाव घेतली. सचिनचे कुटुंबीयांनी नाल्याच्या दिशेने जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाती निराशाच लागली. याबाबत माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना बोलावून सचिन पवारचा शोध सुरू केला. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. मात्र, रात्री गडद अंधारामुळे शोध व बचाव कार्यात अडथडे येत असल्याने रात्री बचावकार्य थांबविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT