Chief Minister Eknath Shinde  esakal
जळगाव

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे जळगावहून धुळ्याला रवाना

Jalgaon News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (ता. ५) जळगाव विमानतळावर उतरून मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनाने धुळ्याकडे रवाना झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (ता. ५) जळगाव विमानतळावर उतरून मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनाने धुळ्याकडे रवाना झाले. साक्री येथील अपक्ष आमदार मंजुळा गावित यांच्या मुलाचे धुळे येथे लग्न होते. त्याला उपस्थिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने मुंबई येथून विमानाने आले. (Jalgaon State Chief Minister Eknath Shinde landed at Jalgaon Airport and left for Dulha with Minister Girish Mahajan)

धुळे विमानतळावर नाईट लॅडिंगची सुविधा नसल्याने ते जळगाव विमानतळावर उतरले. येथून धुळे येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या खासगी मोटारीने रवाना झाले. आचारसंहिता असल्याने त्यांना खासगी मोटारीने जावे लागले. रस्त्याने जाताना पारोळा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.

फलकावरून वाद

जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता सुरू असल्याने ते काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. पारोळा येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागत करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

Video: जुनं वचन पाळलं! मित्राची सैन्यात निवड होताच खांद्यावर बसवून काढली गावभर मिरवणूक; कोल्हापूरचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT