Yashpal Pawar esakal
जळगाव

Jalgaon Success Story : मठगव्हाण येथील यशपाल पवार बनला आता असिस्टंट कमांडर!

Jalgaon News : ग्रामीण भागातील तरुणाची असिस्टंट कमांडरपदी निवड झाल्याने अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यातील तापी नदीकाठावरील मठगव्हाण येथील सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा यशपाल पवार याने ‘यूपीएससी’मार्फत घेण्यात आलेल्या सेंट्रल आई पोलिस फोर्स (सीएपीएफ)च्या असिस्टंट कमांडरच्या परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये ३३ वा क्रमांक पटकावला.

यशपालचे वडील ज्ञानेश्वर पवार व आई मीना पवार हे शेतकरी दांपत्य. त्यांनी कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. यशपालचे दहावीपर्यंतचे शिक्षण अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात झाले. अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयात केले.

पुणे येथील एस. पी. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. तेथूनच त्याने स्पर्धा परीक्षेचीही तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेत दोनदा अपयश येऊनही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. गृहमंत्रालयात अधिकारी पदावर कार्यरत असतानाच त्याने ‘यूपीएससी’तर्फे घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची परीक्षा दिली. त्यात यशपाल आता असिस्टंट कमांडरपदी रुजू होणार आहे. (latest marathi news)

यशपाल पवार याचे एकत्रित कुटुंब आहे. आजोबा वारकरी आहेत. ग्रामीण भागातील तरुणाची असिस्टंट कमांडरपदी निवड झाल्याने अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील स्पर्धा परीक्षा चळवळीला अजून बळकटी मिळेल.

"मी शालेय जीवनापासूनच उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगल्याने माझा कला शाखेकडे कल होता. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर असल्याने चिकाटीने स्पर्धा परीक्षेला सामोरे गेलो. प्रारंभी अपयश आले. मात्र खचून न जाता यशाला गवसणी घातली."

- यशपाल पवार, नवनियुक्त असिस्टंट कमांडर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT