Fire damage. esakal
जळगाव

Jalgaon News : दिवस उजाडताच 2 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी; फर्निचर दुकानासह वाशिंग सेंटर जळून खाक

Jalgaon : शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील विल्स फार्निचर दुकानासह वाशिंग सेंटर दुकानाला रविवार सकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील विल्स फार्निचर दुकानासह वाशिंग सेंटर दुकानाला रविवार (ता.१०) सकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.

शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील हॉटेल बावर्चीच्या शेजारी अर्जून प्रसाद चंद्रबली शर्मा (रा. शिवधाम मंदीर, जळगाव) याचे विल्स फर्निचर दुकान आहे. जुन्या सागवान लाकडांपासून पलंग, दारवाजा, देऊळ, खुर्ची, कपाट आदि साहित्य तयार करुन विक्री करण्यात येते. (Jalgaon sudden fire broke out in shop causing loss of lakhs of rupees)

त्यांच्याच शेजारी देवकिरण विलास पाटील (रा. निवृत्ती नगर, जळगाव) याचे कार वाशिंग सेंटर आहे. रविवार(ता.१०)रोजी सकाळी ७ वाजता फर्निचर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत विल्स फर्निचर दुकान आणि वाशिंग सेंटर मधील सामान जळून खाक झाले आहे.

यात विल्स दुकानात असलेले सागवान लाकूड, यंत्रसामुग्रीसहीत तयार फर्निचर असा जवळपास १५ ते २० लाखांचे नुकसान झाले तर वाशिंग सेंटर मधील कार वाशिंग मशिन.

व्हक्यूम क्लीनअर मशिनी, कोटींग मशिन, फर्निचर आदी असा अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

आगीची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे ७ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमाअंती आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परिसरातील रहिवासी तरुणांसह अग्निशामक दलाने प्रयत्नपुर्वक आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

Weekend Breakfast Special: रोजच्या पराठ्यांना द्या हेल्दी ट्विस्ट! वीकेंडला ट्राय करा पनीर स्टफ्ड बीटरूट पराठा

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १६ मे २०२६ ते २२ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

SCROLL FOR NEXT