Temperature esakal
जळगाव

Jalgaon Summer Heat : सूर्यनारायण तळपले; उन्हाचे चटके असह्य

Jalgaon Summer Heat : राज्यात कमाल तापमान सातत्याने वाढत असून, उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer Heat : राज्यात कमाल तापमान सातत्याने वाढत असून, उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांपार असल्याने उन्हाचा चटका अधिक तापदायक होत असून, उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने विदर्भात पावसाचा अंदाज जरी वर्तविला असला तरी जिल्ह्यात मात्र तापमानात फारशी घट होणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी वर्तविला आहे. (Jalgaon Summer Heat)

शहर व विभागाच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी पारा ३६ अंशांवर होता. तो रविवारी एक अंशांनी वाढून ३७.७ पर्यंत गेला. तर सोमवारी व मंगळवारी तापमानाचा पारा ३७ अंशांवर होता. सकाळी दहापासून चटके बसत होते. दुपारी तर संपूर्ण बाजारपेठ, वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती.

दिवसाच्या वेळेस हवेची कमाल गती तशी ३२ किलोमीटर प्रतितास होती. आकाश सकाळपासूनच निरभ्र होते. यामुळे आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार १८ ते २३ मार्चदरम्यान कमाल तापमान सरासरी ३९ अंशांच्या आसपास राहील. तर किमान तापमान १९ अंशांपेक्षा जास्त नसेल. आकाश निरभ्र राहील.

रस्ते दुपारी ओस

खऱ्या अर्थाने उन्हाळ्याचा चटका मार्चच्या अखेरीत जाणवू लागला आहे. दोन दिवसांपासून पारा ३७ अंशांवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या झळा जाणवत असून, उन्हामुळे दिवसा घराबाहेर जाणे नागरिक टाळत आहेत. रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. वाढत्या उन्हामुळे गॉगल, टोप्या, रूमाल, शीतपेय आदींची मागणी वाढली आहे. (latest marathi news)

आरोग्याची काळजी घ्या

वातावरणातील बदलामुळे आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. लहान मुले व वयोवृद्धांना उन्हाचा जास्त फटका बसला आहे. पारा वाढू लागताच ऊन लागण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तसेच नाकातून रक्त येणे, सर्दी-तापाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेत अधिक पाणी पिणे, उन्हात गेल्यास डोक्याला रूमाल लावणे, आरोग्यदायी आहार घेणे आदी सल्ले डॉक्टर देत आहेत.

"विदर्भात उद्भवणाऱ्या ढगाळ स्थितीचा आपल्याकडे फारसा प्रभाव होणार नाही. भुसावळसह परिसरात आज तापमानाचा पारा ३७ अंशांवर होता. दोन, तीन दिवस हिच स्थिती राहिल. गेल्या आठवड्यात ३५ ते ३७ च्या दरम्यान तापमान होते. २४ तारखेनंतर मात्र तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे."- नीलेश गोरे, वेलनेस वेदर फाउंडेशन, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT