Summer Heat esakal
जळगाव

Jalgaon Summer Heat : तापमानाचा पारा चाळिशी पार! उन्हाच्या झळा असह्य

Jalgaon Summer Heat : यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे सुरवातीचे काही आठवडे तापमान सुसह्य गेले.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे सुरवातीचे काही आठवडे तापमान सुसह्य गेले. यानंतर शुक्रवारी (ता. २२) शहरात हंगामातील सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील पारा प्रथमच चाळिशी पार झाल्याने शहरवासीय आज दिवसभर उकाड्याने हैराण झाले होते. दरम्यान, गतवर्षाच्या तुलनेत तापमान अधिक असल्याचे दिसून येते. (Jalgaon Summer Heat temperature has crossed 40 scorching heat is unbearable)

जिल्ह्यात कमाल तापमान सातत्याने वाढत असून, शुक्रवारी अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार होते. उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. शहर व विभागाच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी पारा ३६ अंशांवर होता. तो रविवारी एक अंशांनी वाढून ३७.७ पर्यंत गेला. तर सोमवारी व मंगळवारी तापमानाचा पारा ३७ अंशांवर होता. तर गुरुवारी तापमान ३९.५ सेल्सिअल इतके होते.

तर शुक्रवारी तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी पार केल्याने सकाळी दहापासून चटके बसत होते. दुपारी तर संपूर्ण बाजारपेठ, वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. दिवसाच्या वेळेस हवेची कमाल गती तशी ३२ किलोमीटर प्रतितास होती. आकाश सकाळपासूनच निरभ्र होते. दरम्यान, आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात कमाल तापमानात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

शीतपेयांना वाढती मागणी

खऱ्या अर्थाने उन्हाळ्याचा चटका मार्चच्या अखेरीत जाणवू लागला आहे. दोन दिवसांपासून पारा ३७ अंशांवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या झळा जाणवत असून, उन्हामुळे दिवसा घराबाहेर जाणे नागरिक टाळत आहेत. रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. वाढत्या उन्हामुळे गॉगल, टोप्या, रूमाल, शीतपेय आदींची मागणी वाढली आहे. (latest marathi news)

अधिक पाणी प्या, उन्हात जाणे टाळा

वातावरणातील बदलामुळे आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. लहान मुले व वयोवृद्धांना उन्हाचा जास्त फटका बसला आहे. पारा वाढू लागताच ऊन लागण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तसेच नाकातून रक्त येणे, सर्दी-तापाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेत अधिक पाणी पिणे, उन्हात गेल्यास डोक्याला रूमाल लावणे, आरोग्यदायी आहार घेणे आदी सल्ले डॉक्टर देत आहेत.

"भुसावळसह परिसरात यंदाच्या हंगामात प्रथमच तापमानाचा पारा ४१.२ अंश सेल्सिअस इतका नोंदविला गेला. येत्या आठवडभरात पारा आणखी दोन अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे."

- नीलेश गोरे, वेलनेस वेदर फाउंडेशन, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT