Police officers while discussing with the villagers in Umarti village, which is a base of illegal arms manufacturing
Police officers while discussing with the villagers in Umarti village, which is a base of illegal arms manufacturing esakal
जळगाव

Jalgaon News : पोलिस अधीक्षकांनी गाठले पिस्तुलांचे गाव उमर्टी! तस्करांवर करडी नजर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मध्यप्रदेश-महाराष्ट्र सिमेवरुन होणारी अवैध शस्त्रांसह गांजा, दारु आणि इतर तस्करीवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसदल यांच्यात सिमा प्रश्‍नांवर संयुक्त बैठक (बॉर्डर कॉन्फरन्स) चोपडा येथे पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता.२७) बडवाणी जिल्‍हा पेालिस अधीक्षक आणि महाराष्ट्र पोलिसदलातर्फे जळगाव पोलिस अधीक्षकांनी संयुक्त पणे अवैध शस्त्रनिर्मीतीचा कारखाना गणला जाणाऱ्या उमर्टी (मध्यप्रदेश) या सातपुडा पर्वतरांजीतील दुर्गम गावात धडकून पाहणी केली. (Jalgaon Superintendent of Police inspects pistol manufacturing village Umarti)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित या दौऱ्यात चोपडा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवरील वैजापूर, उमर्टी, पार उमर्टी, सत्रासेन या गावांलगतच्या महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमांची पाहणी करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, बडवानी (मध्यप्रदेश) जिल्‍हा पोलिस अधीक्षक पुनीत गहलोत यांनी दोन्ही बाजूंच्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी, गुन्हेशाखा प्रमुख आणि गोपनिय विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात गुन्हे करुन मध्यप्रदेशात दडून बसलेले अट्टल गुन्हेगार, दरोडेखोरांची यादी यावेळी डॉ.रेड्डी यांनी मध्यप्रदेश पोलिसांना सोपवली. तसेच, मध्यप्रदेश पोलिसांना अपेक्षीत गुन्हेगारांची माहितीचे देवाण-घेवाण होवुन गुन्हे तपासाला येणाऱ्या अडीअडचणी, गुन्हेगारांची देवाण-घेवाण सुलभ होवून एकमेकांच्या समन्वयातून सिमावर्ती पोलिस ठाणे आणि जिल्ह्याच्या प्रमुखांनी काम करणे अपेक्षित आहे.

दोघेही राज्यातील पोलिसांनी आगामी काळात आपापसात सहकार्याची भूमिका घेत गैरकृत्यांना आळा कसा घालता येईल, याबाबतही दोघे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यात चर्चा करण्यात आली. नगरपरिषद सभागृहात बॉर्डर कॉन्फरन्सवर चर्चा माहितीचे देवाण-घेवाण झाल्यावर तदनंतर सीमावर्ती दुर्गम भागांना अधिकार्यांनी भेटी देवून पाहणी केली.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी यांच्यासोबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, निरीक्षक सावळे, मध्य प्रदेशातील बडवानी जिल्हा पोलिस अधीक्षक पुनीत गहलोत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल पाटीदार, पोलिस उपअधीक्षक कमलसिंग चौहान, पोलिस निरीक्षक माधवसिंग ठाकूर आदी पोलिस अधिकारी मंडळी यावेळी हजर होते. (latest marathi news)

बेकायदेशीर वाहतुकीवर नजर

या वेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आंतरराज्य सिमेवरील तपासणी नाके व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रोख रक्कम, मद्य अंमली पदार्थ, वस्तू आदीचे बेकायदेशीर वाहतूक नियंत्रण व पर्यवेक्षणाच्या अनुषंगाने नियोजन सादर केले. सर्व उपस्थितांना आंतरराज्य सिमेवरील निवडणूक काळातील विविध वस्तू, मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम आदींची वाहतुकीवरील नियंत्रण व निवडणूक कालावधीत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी समन्वय राखण्याच्या सूचना महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

उमर्टी आले टार्गेटवर!

अवैध शस्त्रनिर्मिती आणि विक्रीसाठी कुख्यात असलेल्या उमर्टी (मध्यप्रदेश) या गावाला आजवर भेट देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये डॉ.महेश्‍वर रेड्डी यांचाही समावेश असून, बॉर्डर कॉन्फरन्समध्ये उमर्टीच्या बेकायदा शस्त्रनिर्मितीसह त्याच्या तस्करीवर खासकरुन चर्चा करुन संबधितांवर कारवाईसाठी संयुक्त ऑपरेशन राबवण्याचे सुतोवाच यावेळी डॉ.रेड्डी यांनी दिले आहे.

महाराष्ट्रातील ८४ अट्टल दरोडेखोर, गुन्हेगार मध्यप्रदेशात दडून बसले असून, त्यांचा शोध घेण्यासह अटकेसाठी सहकाऱ्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. पोलिस अधिक्षकांनी स्वतः उमर्टीची पाहणी केल्याने यासंदर्भात केव्हा ऑपरेशन उमर्टी होईल, याची काही शाश्‍वती नाही. म्हणून आजपासून सिमावर्ती भागातील पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT