Sand  esakal
जळगाव

Jalgaon Sand News : नांद्रा बुद्रुक वाळू डेपोला स्थगिती ? ठेका स्थगित करण्याची जिल्हा प्रशासनावर नामुष्की

Jalgaon Sand : नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव) येथील गिरणा नदीपात्रातील वाळू काढण्याच्या ठेक्याला राजकीय दबावामुळे स्थगिती देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Sand News : नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव) येथील गिरणा नदीपात्रातील वाळू काढण्याच्या ठेक्याला राजकीय दबावामुळे स्थगिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नांद्रा बुद्रुक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाळू ठेका रद्द करावा, अशी मागणी केली होती. नंतर आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर राजकीय दबाव वापरून ठेका रद्द करण्यात आल्याचा आरोप संबंधित ठेकेदाराने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. ( Suspension of Nandra Budruk Sand Depot )

गिरणा नदीपात्रातील गाळमिश्रित वाळू विक्रीसाठी निश्चित केलेले क्षेत्र नांद्रा तापीकाठ ते अमरधामपर्यंत आहे. गाळमिश्रित वाळू काढणे, तिची डेपोपर्यंत वाहतूक करणे, डेपो व्यवस्थापन करणे व मागणीनुसार ग्राहकांच्या वाहनात गाळमिश्रित वाळूची भराई करण्यासाठी व्ही. के. इंटरप्रायजेस यांनी निविदा घेतली आहे. मात्र, नांद्रा बुद्रुक ग्रामस्थांनी ५ जूनला ग्रामसभा घेतली. त्यात गावाशेजारी गिरणा नदी आहे.

या वर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात पडला असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. नदीपात्रातील वाळूचा उपसा केल्यास पाण्याची पातळी अजून कमी होईल. परिणामी, शेतातील पिकांना, तसेच गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. वाळू वाहतूक करताना गावातील रस्ते खराब होतात. (latest marathi news)

यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो. वाळू वाहतुकीची वाहने वेगात धावत असल्याने अपघात होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण गावाने वाळू लिलावास विरोध दर्शविणारा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. या कारणास्तव नदीपात्रातून गाळमिश्रित वाळू काढणे, तिची डेपोपर्यंत वाहतूक करणे, ग्राहकांच्या मागणीनुसार वाहनात गाळमिश्रित वाळूची भराई करण्यासाठी दिलेल्या २० मेच्या आदेशास तात्पुरती स्थगिती दिली आहे.

राजकीय संबंधाचा गैरवापर

नांद्रा वाळू डेपो व्यवस्थापनाचा लिलाव घेणारे व्ही. के. इंटरप्रायजेसचे विलास यशवंते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. डेपोची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्नशील असताना, नांद्रा बुद्रुकचे काही ग्रामस्थ वाळू डेपो सुरू होऊ नये, यासाठी अनिष्ट कार्यवाही करीत आहेत. वाळू डेपो सुरू केल्यास वाहने फोडणे, नियंत्रण कक्षाला आग लावणे, डेपोवरील कर्मचाऱ्यांना शारीरिक इजा पोहोचविण्याच्या धमक्या देत आहेत. राजकीय संबंधाचा गैरवापर करून राजकीय लोकांना फोन लावायला सांगत आहेत. वाळू डेपो सुरू न करण्यासाठी दबाव आणीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT