Crowd of citizens to fill water  esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात टँकरची वाटचाल शंभरीकडे! पाणीटंचाईची गावे 53 गावांवरून 69 वर

Jalgaon News : जिल्ह्यात जसजसा उन्हाचा कडाका वाढत आहे. तसतशी पाणीटंचाई गावांची संख्या वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यातील तापमानाने ४३.३ अंश ओलांडले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. २३ दिवसांत पाणीटंचाईची गावे ५३ वरून ६९ वर गेली आहेत, तर टँकरची संख्याही ६९ वरून ८९ वर पोचली आहे. मेअखेर टँकरची संख्या शंभर पार करेल, एवढी तीव्र पाणीटंचाईची भिती निर्माण झाली आहे. (Jalgaon Tanker moves to hundred in district news)

जिल्ह्यात जसजसा उन्हाचा कडाका वाढत आहे. तसतशी पाणीटंचाई गावांची संख्या वाढत आहे. २ एप्रिलला २९ गावांत ३३ टँकरने पाणीपुरवठा होत होता. ५ एप्रिलला त्यात वाढ होऊन टंचाईची गावे २९ वरून ४२ वर गेली, तर टँकरही ३३ वरून ५१ झाले. आता टंचाईग्रस्त गावांची संख्या ४२ वरून ५३ वर गेली. १४ एप्रिलला टँकर ५१ वरून ६९ वर (१८ टँकर) गेले. आता टंचाईग्रस्त गावे ५३ वरून ६९ (१६ गावे वाढली) पोचली आहेत. टँकरही ६९ वरून ८९ (२० वाढ) गेली आहेत.

२०२३ मध्ये ८४ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक होतील. यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारी २०२४ पासूनच सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश दिले होते. यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात २ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

टँकर सुरू असलेली गावे अशी

तालुका--गावे--टँकर

जळगाव--५--७

जामनेर--५--५

धरणगाव--०--०

एरंडोल--०--०

भुसावळ--१--१

यावल--०--०

रावेर--०--०

मुक्ताईनगर--०--०

बोदवड--०--०

पाचोरा--०--०

चाळीसगाव-- ३२--४५

भडगाव--५--५

अमळनेर--१७--२२

पारोळा--४--४

चोपडा--०--०

एकूण--६९--८९

(Latest Marathi News)

१३० गावांसाठी १५० विहिरींचे अधिग्रहण

जामनेर तालुक्यातील १० गावांत १० विहिरींचे अधिग्रहण, धरणगाव तालुक्यातील १३ गावांत १५ विहिरी, एरंडोलमध्ये ६ गावांना सात विहिरी, भुसावळमधील दोन गावांत दोन विहिरी, रावेर व बोदवड तालुक्यांत प्रत्येकी एका गावात एक विहीर, मुक्ताईनगरला सात गावांत सात विहिरी, पाचोरा तालुक्यातील तीन गावांत तीन, चाळीसगाव तालुक्यातील ३८ गावांत ४७ विहिरी, भडगावमधील तीन गावांत तीन, अमळनेर तालुक्यातील ३१ गावांत ३७ विहिरी, पारोळ्यातील १२ गावांत १२, चोपडा तालुक्यांत ३ गावांत सहा विहिरी, अशा एकूण १३० गावांत १५० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावांची नावे अशी

-चाळीसगाव तालुका : विसापूर तांडा, अंधारी, करजगव, कृप्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्रह्मणशेवगे, घोडेगाव, हातगाव

भिल्ल वस्ती, पिंप्री बुद्रुक, प्र.दे., खराडी, डोणदिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोदे प्र.दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा क्रमांक १.

-भडगाव तालुका : तळबंद तांडा, वसंतवाडी, आंचळगाव, मळगाव, वडगाव बुद्रुक.

-अमळनेर तालुका : तळवाडे, शिरसाळे बुद्रुक, निसडी, लोणपंचम, नगाव खुर्द, देवगाव देवळी, सबगव्हाण, भरवस, अंचलवाडी, आटाळे, पिंपळे खुर्द चिमणपुरी, डांगर बुद्रुक, नगाव बुद्रुक, आडी अनोरे, गलवाडे बुद्रुक, लोणचारम तांडा, पिंपळे बुद्रुक.

-पारोळा तालुका : खेडीढोक, हणुमंतखेडे, कन्हेर, चहुत्रे/वडगाव प्र.अ.

-भुसावळ तालुका : कंडारी.

-जामनेर : रोटवद, मोरगाव, काळखेडे, एकुलती बुद्रुक व एकुलती खुर्द.

-जळगाव तालुका : वराड, लोणवाडी बुद्रुक, सुभाषवाडी, शिरसोली, कुसुंबे खुर्द.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : काश्मीरहून दिल्लीला ३६ टन सफरचंद पाठवले जाणार

Manchar News : स्मार्ट मीटरमुळे गरीब शेतमजुरांवर लाखोंचे वीजबिल, आंबेगावात कुटुंब अंधारात

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT