जळगाव तरसोद- चिखली महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले! sakal
जळगाव

जळगाव : महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले!

नशिराबादजवळील काम ठप्प; भुसावळचे काम संथगतीन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तरसोद- चिखली या महामार्गावरील टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा करत टोल वसुलीही सुरू करण्यात आली असली तरी नशिराबादजवळच्या व भुसावळातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण आहे. पैकी नशिराबादजवळील पुलाचे काम मधूनच सोडून देण्यात आले असून भुसावळातील पुलाचे कामही संथगतीने सुरू आहे.

धुळे- जळगाव विदर्भाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६च्या फागणे- तरसोद व तरसोद- चिखली या दोन टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामांना एकाचवेळी सुरवात झाली. दोन्ही वेगळ्या एजन्सीद्वारे ही कामे सुरू करण्यात आली. पैकी तरसोद- चिखली टप्प्यातील ६७ किलोमीटरचे काम वेल्स्पन या नामांकित एजन्सीने घेतले.

दोन वर्षांत काम पूर्ण

हजार कोटींच्या या प्रकल्पाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. दोन- अडीच वर्षांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले. त्यात तीन रेल्वे उड्डाणपुलांसह अन्य लहान- मोठ्या पुलांच्या कामांमुळे हे काम लांबले. परंतु, तरीही फागणे- तरसोद टप्प्यातील कामापेक्षा लवकर पूर्ण झाले.

पुलांचे काम अपूर्ण

हे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी काही ठिकाणी काम बाकी आहे. त्यात नशिराबादजवळ (टोलनाक्यानंतर) सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम बाकी आहे. या पुलावरून एकच बाजू सुरू असून दुसऱ्या बाजूला करण्यात आलेले भराव व डांबरीकरणाचे काम तांत्रिक कारण दाखवून उखडण्यात आले. तेव्हापासून हे काम ठप्पच आहे. त्याठिकाणी ना यंत्रणा आहे ना मजूर. तर भुसावळ शहरात प्रवेश करते वेळी नाहाटा महाविद्यालयाच्या आधी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. अर्थात, हे कामही गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही.

पुलांवर होतेय कोंडी

या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांचे काम अपूर्ण असल्याने एकाच बाजूने वाहतूक होत आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही दिशांनी येणाऱ्या वाहनांची ऐन पुलावर आल्यानंतर गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या पुलांच्या कामासाठी आवश्‍यक तो पाठपुरावा होताना दिसत नाही. वाहनधारकांचे मात्र हाल होत आहेत.

.. तरीही टोल सुरू

तरसोद- चिखली टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी ते पूर्ण झालेले नाही. या दोन्ही रेल्वे उड्डाण पुलांसह अन्य काही ठिकाणचे किरकोळ काम बाकी आहे. महामार्गाला लागून ड्रॅनेज व बस थांब्यांचेही काम अपूर्ण आहे. असे असताना या कामाचे लोकार्पण झालेले नाही. तरीही ऑगस्ट २०२१पासून टोल सुरू करण्यात आला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल का द्यावा? अशी भावना वाहनधारकांमधून तीव्र होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup : एका राजाने निवडला संघ... खेळाडूंवरील गुन्हे माफ अन् इंग्लिश तेल कंपनी बंद पाडण्याची धमकी; १९३० च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा तुम्ही ऐकला नसेल...

Donald Trump Team Split: इराण करारावरून ट्रम्प यांच्या प्रशासनात फूट; सीआयएच्या गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

Broiler Chickens Death : एका रात्रीत पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यु; सुमारे सात लाखाचे नुकसान, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Jawan Pravin Avhade : कन्यारत्नाच्या आनंदावर विरजण; जवान प्रवीण आव्हाड यांचे अपघाती निधन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेच्या २४ उमेदवारांना नोटीस, निवडणुकीचा हिशोब न दिल्याने कारवाई

SCROLL FOR NEXT