crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रामदेववाडी ‘हीट ॲण्ड रन’ प्रकरण; मित्रांसह कार सोडून पळून गेलेल्या तिसऱ्याला अटक

Jalgaon Crime : रामदेववाडी अपघात प्रकरणात अपघात झाल्यावर कार सोडून पळून गेलेला तिसरा संशयित ध्रुव नीलेश सोनवणे (वय १९, रा. गायत्रीनगर, जळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : रामदेववाडी अपघात प्रकरणात अपघात झाल्यावर कार सोडून पळून गेलेला तिसरा संशयित ध्रुव नीलेश सोनवणे (वय १९, रा. गायत्रीनगर, जळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो पुणे येथे जाण्यासाठी निघाला असतानाच पोलिसांनी ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ( Third arrested after fleeing from car with friends of hit and run case )

जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेववाडीजवळ मंगळवारी (ता. ७) सुसाट कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुलांचा व भाचा अशा चार जणांचा मृत्यू झाला होता. दाखल गुन्ह्यात पेालिसांनी १७ दिवसांनंतर अखिलेश संजय पवार व अर्णव अभिषेक कौल या दोघांना गुरुवारी (ता. २३) मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

या दोघांबरोबर त्याच कारमध्ये असलेल्या तिसऱ्या तरुणाचे नाव घटना घडल्यापासून समोर आले होते. मात्र, अटकेतील संशयितांच्या जबाबात त्याचे पुन्हा नाव आल्याने पोलिसांनी ध्रुव सोनवणे याला अटक केल्याची माहिती तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा बळी..! पिंजरा लावण्याची राधाकिसन पठाडे यांची मागणी

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

SCROLL FOR NEXT