Dead fish in Merun Lake. esakal
जळगाव

Jalgaon News : दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू; मेहरूण तलावाच्या काठावरील धक्कादायक प्रकार

Jalgaon : शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मेहरूण तलावाच्या काठावर शुक्रवारी (ता. ५) मोठ्या प्रमाणावर मासे मृत पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मेहरूण तलावाच्या काठावर शुक्रवारी (ता. ५) मोठ्या प्रमाणावर मासे मृत पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाला विचारणा केली असता, त्यांनी कानावर हात ठेवले. जळगाव शहरात एकमेव मेहरूण तलाव मोठा जलस्त्रोत आहे. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे. घाट तयार करून तलावाच्या सौंदर्यात भरही पडली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मेहरूण तलावावर मोठी गर्दी होत असते. (Thousands of fish dead from contaminated water of Mehrun Lake )

त्यामुळे या तलावाला विशेष महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मेहरूण तलाव दूषित होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मेहरूण तलावात आणि तलावाकाठी मासे मृतावस्थेत आढळून आले. मृत झालेले मासे कुत्रे खातांनाचे चित्रही तलाव परिसरात दिसून आले. मात्र, माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरीत आहे. मृत झालेल्या माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

येथील मेहरूण तलावाच्या काठावर मृत मासे पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. मेहरूण तलावात येणाऱ्या ॲसिडयुक्त दूषित पाण्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. तलावात परिसरातील नाले, गटारीचे पाणी येते. त्यात काहींनी ॲसिड टाकले असावे. त्या ॲसिडमुळे गुदमुरून माशांचा मृत्यू झाला असावा, असे वन्यजीव सरंक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांनी सांगितले. (latest marathi news)

प्रदूषण मंडळाची दखल

मेहरूण तलावावरील मृत माशांची माहिती मिळताच प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी करणसिंग राजपूत यांनी तातडीने तलाव स्थळ गाठले. तेथे त्यांनी पाहणी करून तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले. शॉक लोड किंवा सांडपाण्यामुळे मासे मृत पावले असतील, असा प्राथमिक अंदाज आहे. पाण्याची तपासणी केल्यावरच याबाबत ठोस कारण समजू शकेल, असे करणसिंग यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ते मेहरूण तलावाशेजारी तपासणी करीत होते.

चौकशीचे आदेश : आयुक्त

याबाबत महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की मेहरूण तलावात मासे मृत झाल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला नाही. नेमके काय कारण आहे, याबाबत आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच कारण स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT