Uddhav Thackeray esakal
जळगाव

Jalgaon News : हुकूमशहा मोदीविरोधात ताकदीने सामना करा : उध्दव ठाकरे

Jalgaon : हुकूमशहा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढाई आहे, जळगाव लोकसभेत त्याविरोधात ताकदीने सामना करावा लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हुकूमशहा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढाई आहे, जळगाव लोकसभेत त्याविरोधात ताकदीने सामना करावा लागणार आहे. त्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदार संघ उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आला आहे. मातोश्रीवर आज जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सुचना दिल्या. (Jalgaon Uddhav Thackeray statement Stand strong against dictator Modi)

त्यामुळे पक्षातर्फे लोकसभा निवडीसाठी जोरदार तयारी आहे. पक्षातर्फे पारोळा येथील हर्षल माने व जळगावचे माजी महापौर कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.अमळनेरच्या भाजपच्या ललीता पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्या भेट घेउन जळगाव लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली.

चर्चेत श्री ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह जळगाव जिल्हयातून इच्छुक उमेदवारी कुलभूषण पाटील, हर्षल माने तसेच जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे, उमेश पाटील, श्रीकात पाटील,पाचोरा येथील वैशाली सूर्यवंशी,दिपक राजपूत आदी उपस्थित होते.

द्याल तो उमेदवार निवडूण आणू

जळगावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ताकदीने निवडणूक लढविण्याचे मान्य केले. तसेच पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर उमेदवार निवडीची जबाबदारी सोपविण्यात आली.ते जो उमेदवार जळगाव लोकसभेसाठी देतील त्या उमेदवारांचा प्रचार करून त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकमताने केला आहे. (latest marathi news)

भाजपच्या ललीता पाटील उपस्थित

भाजपच्या अमळनेर येथील पदाधिकारी ललीता पाटील यांनी मुंबईत मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच त्या बैठकीला उपस्थित होत्या.त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातून ठाकरे यांच्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

मात्र त्यांनी पक्षात प्रवेश करून शिवबंधन बांधले नसल्याचे सांगण्यात आले. ललीता पाटील कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेल्या होत्या. त्या पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण आज त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

"भाजपच्या ललीता पाटील या आज मुंबईत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकिला उपस्थित होत्या. त्यांनी पक्षाकडे जळगाव लोकसभा लढविण्यासाठी उमेदवारीची मागणीही केली आहे."- विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT