Unconscious sub inspector dies in Jalgaon (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : बेशुद्ध उपनिरीक्षकाचा जळगावात मृत्यू!

Jalgaon : शहरातील नवीन बसस्थानकाशेजारील भजे गल्लीत ३५ वर्षीय गृहस्थ बेशुद्धावस्थेत मिळून आले होते. जिल्‍हापेठ पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी धाव घेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील नवीन बसस्थानकाशेजारील भजे गल्लीत ३५ वर्षीय गृहस्थ बेशुद्धावस्थेत मिळून आले होते. जिल्‍हापेठ पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी धाव घेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक गोकुळ काशीनाथ गवारे (वय ३५) असे मृताचे नाव आहे.(Jalgaon Unconscious sub inspector dies)

गोकुळ गवारे (रा. चित्तेगाव, ता. निफाड, जि. नाशिक) हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस नियंत्रण कक्षात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात परिसरातील व्यावसायिकांनी माहिती कळविल्यावर पोलिस नाईक मिलिंद सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत हॉटेल प्रीतमसमोरून गवारे यांना जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले.

डॉ. सचिन पाटील यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक राकेश मानगवार आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. (latest marathi news)

उपनिरीक्षक गवारे यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. जिल्‍हापेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक मीरा देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT