Burned cotton & school letters blown off by lightning esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain Damage: बोदवडला वादळी तडाखा! पिकांसह घरांचे नुकसान; जलचक्र परिसरात घरांचे, शाळेचे पत्रे उडाली

Jalgaon News : बोदवड शहरासह तालुक्यात मंगळवारी (ता. ९) दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे

सकाळ वृत्तसेवा

बोदवड : शहरासह तालुक्यात मंगळवारी (ता. ९) दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरात जय मातादी जीनिंग प्रेसिंगचे शेड उडाल्याने दीड हजार क्विंटल कपाशी, तर हजार, बाराशे क्विंटल सरकीचे नुकसान झाले. तसेच जलचक्र परिसरातही वादळी तडाखा बसला आहे.

येथे जिल्हा परिषद शाळेचे सर्व पत्रे उडाली. तसेच शहरात अण्णा भाऊ साठेनगरमध्ये अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली, भिंती कोसळल्या असून, घरांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. (Jalgaon Unseasonal Rain Damage Thunderstorm hits Bodwad news)

जीनिंगचे कोसळलेले छत.

जलचक्र बुद्रूक, खुर्द व जलचक्र तांडा येथे वादळी वाऱ्यामुळे गावात खूप नुकसान झाले आहे. गावात झाडे व वीजखांब तुटलेले आहेत. दिनकर ठाकरे, दामू शिराळे, आनंद सुरवाडे, सतीश पाटील, बेबाबाई खराटे, राजू पाटील, सतीश ठाकरे, सुशील पाटील, विठ्ठल पाटील यांच्या घरांवरील पत्रे उडून घराच्या भिंतीचे नुकसान झाले आहे.

तसेच विनोद सपकाळ, सुरेश सपकाळ आणि गणेश सपकाळ, सरला पाटील यांचे तीळ पीक, नलिनीबाई पाटील यांची ज्वारी, साहेबराव पाटील (जलचक्र) व निंबाजी बावस्कर यांचे ज्वारी पिकांसह अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ऐणगाव येथे घरांच्या नुकसानासह विनोद कोळी यांचा मका, ज्वारी, जुनोना येथे केळीबाग यांसह इतरही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.  (latest marathi news)

वीज कोसळल्याने कापूस जळाला

हरणखेड येथे प्रफुल्ल वराडे याची पंधरा ते २० क्विंटल कपाशी वीज कोसळल्याने जळाली. यांसह मका, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने व वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

आता वीजतारा जोडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. या अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी तहसीलदार अनिल वाणी यांनी केली व बुधवारी पंचनामे करण्यात येतील, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Maharashtra Rains: जुन्या पिढीपेक्षा आताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय.. लांबलेल्या पावसामुळे सोशल मीडियावर मनोरंजक कॉमेंट्सची बससात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

SCROLL FOR NEXT