Damage to maize crop due to wind storm in the field. esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain : अमळनेर, यावल तालुक्यांत गारपीट; वादळी पावसाचा तडाखा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, यावल, एरंडोल तालुक्यासह काही भागांत शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या वेळी शहरात गारपीट देखील झाली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, यावल, एरंडोल तालुक्यासह काही भागांत शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या वेळी शहरात गारपीट देखील झाली. वादळी वाऱ्याचा जोर एवढा होता, की शहरातील अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले आहेत. शहरासह ग्रामीण भागाचा वीजपुरवठा वादळी वाऱ्यामुळे विस्कळीत झाला आहे. (Jalgaon Unseasonal Rain Hail in Amalner Yawal taluka)

दरम्यान, एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात शेतात काम करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर कळमसरे (ता. अमळनेर) येथे देखील झाडावर वीज कोसळली. अमळनेर तालुक्यातील कळमसरे, मारवड, धार, तासखेडा,अंतुर्ली या भागात जोरदार गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला.

यामुळे गहू, हरभरा, मका या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शहरातील न्यू प्लॉट, ढेकू रोड, पिंपळे रोड, प्रताप मिल कंपाउंड, ख्वाजा नगर, तांबेपुरा या भागात झाडे उन्मळून पडली आहेत. वाऱ्याचा जोर एवढा होता की शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स, घरावरील छपरे, शेड पडलेले आहेत. तालुक्यासह शहरात कुठेही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा अंदाज आहे. (latest marathi news)

यावल तालुक्यात ट्रॅक्टरवर झाड कोसळले

यावल तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाचला जोरदार वादळासह गारांचा पाऊस पडला. तालुक्यातील नायगाव येथे एक झाड कोसळून त्याखाली ट्रॅक्टर दबल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितली तर किनगाव परिसरासह चुंचाळे, दहिगाव, सावखेडासीम, सातोद, वड्री, यासह सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना या वादळी पावसाचा फटका बसला आहे.

सुमारे पाऊण तास जोरदार वादळासह पाऊस सुरू होता. सध्या केळी कापणी सुरू असून, अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे. वादळी पावसाने केळी, कांदा पिकाचे किती नुकसान झाले, हे मात्र समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT