Ganapur (Chopda) Shivarat Prakash Patil's field work in progress. esakal
जळगाव

Jalgaon Water Crisis : ‘मे हिट’च्या तडाख्याने भूजल पातळीत घट! बहुतांश भागात 2 ते 3 मीटरने खालावली

Jalgaon News : तालुक्यात विविध भागात पाण्याची खोली वेगवेगळी असून लासूर, चौगाव, चुंचाळे, चहार्डी आदी भागात ट्यूबवेल करताना पाचशे फुटापर्यंत खोल न्यावे लागत असल्याची उदाहरणे आहेत

ॲड. बाळकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : खानदेशात एप्रिल, मे महिन्यात तीव्र झालेल्या उन्हामुळे भूगर्भातील पाणीपातळी बऱ्याच भागात दोन ते तीन मीटरने खालावली असून, शेतकरी आता विहीर कोरणी व नवीन ट्यूबवेल करीत असल्याचे दिसून आले आहे. चोपडा तालुक्यात काही भागात जमिनीखाली दगड असल्याने प्रेशर बोर मशीनच्या साहाय्याने कूपनलिका (ट्यूबवेल) केल्या जातात. तर काही भागात फक्त माती असल्याने मड पंपच्या साहाय्याने ट्यूबवेल केल्या जात आहेत. (Jalgaon Groundwater level decreased due to May summer news)

तालुक्यात विविध भागात पाण्याची खोली वेगवेगळी असून लासूर, चौगाव, चुंचाळे, चहार्डी आदी भागात ट्यूबवेल करताना पाचशे फुटापर्यंत खोल न्यावे लागत असल्याची उदाहरणे आहेत. तर गणपूर, भवाळे व अनेर काठालगत हीच पाणी पातळी वर असल्याने दीडशे ते दोनशे फुटावर मोटार सोडल्यास ट्युबवेल चालत असल्याचे दिसून आले आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात व दक्षिण भागात पाणी पातळी मध्यम असून तालुक्याचा एकूण विचार करता सुमारे तीनशे ते चारशे फुटापर्यंत बोर करावे लागत असल्याची आजची स्थिती आहे. एप्रिल आणि मे महिन्यात बऱ्याचदा पाणी पातळी खाली जाते. (Latest Marathi News)

यावर्षी आजच्या घडीला पाणीपातळी दोन मीटरने खाली गेली असून, शेतकऱ्यांना ट्यूबवेलमध्ये दोन ते तीन पाईप म्हणजे २० ते ३० फूट पंप सेट खाली सोडावे लागल्याची उदाहरणे आहेत. दरवर्षी पावसाळा संपला की नवीन ट्यूबवेल करण्याच्या कामाला सुरुवात होते. यावर्षी सुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नसले तरी बऱ्याच ट्यूबवेल झाल्याचे दिसून आले आहे.

साधारणपणे शंभर ते एकशे दहा रुपये फूट याप्रमाणे ट्यूबवेलचे दर असून दोन, तीन, चार दिवसांत एका ट्यूबवेलचे काम होत असल्याने तालुक्यात दोन ते तीन ट्यूबवेलच्या गाड्या बोर करताना दिसून येत आहेत. पाणी खोल जात असल्याचे दिवसेंदिवस जाणवत असून, दरवर्षी उन्हाळ्यात खालावणारी पाणी पातळी पावसाळा चांगला झाला की भरून निघते. ती यावर्षीही भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT