While giving a statement to the Chief Executive of the Municipality Mahesh Waghmode about the water shortage in Shiv dattanagar, B. Y. Sonawane, former corporator Raju Awate esakal
जळगाव

Jalgaon Water Crisis : भुसावळच्या शिवदत्त नगरात पाणीटंचाई

Jalgaon Water Crisis : शिवदत्तनगर भागात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणीटंचाईची समस्या सोडविण्याबाबत तेथील रहिवाशांनी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना निवेदन दिले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Crisis : येथील शिवदत्तनगर भागात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणीटंचाईची समस्या सोडविण्याबाबत तेथील रहिवाशांनी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना निवेदन दिले. उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यातच नगरातील बहुतांश बोअरवेल कोरडे पडत आहेत. नागरिक स्वतःचा पैसा, वेळ खर्च करून नव्याने बोअरवेलचे काम करत आहेत, पण २५० ते ३५० फुटावर सुद्धा पाणी लागत नसल्याचे चित्र सध्या शिवदत्त नगर भागात दिसून येत आहे. (Jalgaon Water Crisis Water shortage in Shiv dutt Nagar of Bhusawal)

येत्या एप्रिल, मे महिन्यात उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. या भागात प्रशासनाकडून जलवाहिनी टाकली गेली. मात्र त्याला पाच वर्षे उलटून गेले, पण पाण्याचा एक थेंब सुद्धा आला नाही. परिसरातील भागांना पाणीपुरवठा करणारी टाकी आहे.

जलवाहिनीच्या माध्यमातून शिवदत्त नगर भागासाठी या पाणी टाकीतून पाणीपुरवठा करावा.

प्रशासनाने लवकरात लवकर शिवदत्त नगरवासीयांचा पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्याकडे केली.

या वेळी बी. वाय. सोनवणे, नगरसेवक राजू आवटे, वेदप्रकाश ओझा, मनीष पवार, विजय यादव, आयुष श्रीवास, शैलेश वर्मा आदी नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT