Water Supply by Tanker esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात पाणीटंचाई 42 गावांवरून 53 गावांत; उन्हाळ्याची तीव्रता

Jalgaon News : जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवस उन्हाचा कडाका कमी झाला होता. आता तापमान पुन्हा वाढू लागले आहे. तसतशी पाणीटंचाई असलेल्या गावांची संख्या वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवस उन्हाचा कडाका कमी झाला होता. आता तापमान पुन्हा वाढू लागले आहे. तसतशी पाणीटंचाई असलेल्या गावांची संख्या वाढत आहे. २ एप्रिलला २९ गावांत ३३ टँकरने पाणीपुरवठा होत होता. ५ एप्रिलला त्यात वाढ होऊन टंचाईची गावे २९ वरून ४२ वर गेली, तर टँकरही ३३ वरून ५१ वर गेले होते. आता टंचाईग्रस्त गावांची संख्या ४२ वरून ५३ वर गेली (११ गावे वाढली). (Jalgaon Water scarcity in district from 42 villages to 53 villages Intensity of summer)

टँकर आता ५१ वरून ६९ टँकरवर (१८ टँकर) गेली आहे. २०२३ मध्ये ८० टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवतील. यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारीपासूनच सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश दिले होते. यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात २ ते ८ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

टँकर सुरु असलेली गावे

तालुका--गावे--टँकर

चाळीसगाव--२७--३८

अमळनेर--१७--२२

भडगाव--२--२

भुसावळ--१--१

पारोळा--२--२

जळगाव--२--२

८५ गावांसाठी १०० विहिरीचे अधिग्रहण

चाळीसगाव तालुक्यातील ३३ गावांतील ४३ ,अमळनेर तालुक्यांतील २७ गावांत ३२, भडगाव तालुक्यातील तीन गावांसाठी तीन, भुसावळ तालुक्यातील दोन गावांत दोन, पारोळा तालुक्यात ४ गावांत ४, पाचोरा तालुक्यात तीन गावांना तीन.

धरणगाव तालुक्यातील ९ गावांत १०, तर जामनेर तालुक्यातील ४ गावांत ४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. एकूण ८५ गावांत १०० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT