Sewage accumulated in front of Nimbhora house due to overflowing sewer. esakal
जळगाव

Jalgaon Water Shortage : निंभोरा परिसरात अनियमित पाणीपुरवठा

Jalgaon News : तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक वीज केंद्र ५०० मेगावॉट गेटसमोरील साकरी शिवारातील निंभोरा बुद्रुक परिसरात ३५० रहिवासी आपल्या कुटुबांसह वास्तव्याला आहेत.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक वीज केंद्र ५०० मेगावॉट गेटसमोरील साकरी शिवारातील निंभोरा बुद्रुक परिसरात ३५० रहिवासी आपल्या कुटुबांसह वास्तव्याला आहेत. येथील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळवर मिळत नसल्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सांडपाण्याचे डबके ठिकठिकाणी साचल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Jalgaon Water Shortage Irregular water supply in Nimbhora)

या परिसरात सांडपाणी वाहून नेणारी गटार नसल्यामुळे येवले यांच्या प्लॉटमध्ये परिसरातील नागरिकांच्या घरातील सांडपाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे डेंगी, मलेरियासारख्या डासांची उत्पत्ती झाल्याने परिसरातील नागरिकांना आजाराचे लक्षणे जाणवत आहेत. त्याचप्रमाणे परिसरात रस्त्यांची व्यवस्था नाही.

याबाबत नागरिकांनी निंभोरा ग्रामपंचायतीत तक्रार केली असता, संबंधित परिसर आमच्या ग्रामपंचायत हद्दीत येत नाही, असे उत्तर ग्रामपंचायतीकडून दिले जाते, तर साकरी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असता. (latest marathi news)

शासनाचा निधी आला की काम करू, असे फक्त तोंडी आश्वासने मिळतात. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने यावर तोडगा काढला नाही, तर परिसरातील महिला व नागरिक ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा काढणार, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. याबाबत ग्रामपंचायतीला नागरिकांनी निवेदन दिले आहे. याबाबत ग्रामसेवकांना विचारणा केली असता, त्यांनी निवडणूक झाल्यानंतर कामे केली जातील, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sadhvi Pragya : मी त्यांना कधीच मनापासून माफ करणार नाही... प्रज्ञा साध्वी सिंह यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले होते?

Donald Trump: भारताची अर्थव्यवस्था बुडण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या X पोस्टमुळे खळबळ

काय सांगता! ठरलं तर मग मालिकेत येणार 7 वर्षांचा लीप? मालिकेत होणार मोठा बदल

IAS Video : चक्क IAS ऑफिसरने आंदोलन करणाऱ्या वकिलासमोर मारल्या उठाबशा, शिक्षेमागचं नेमकं प्रकरण काय? व्हिडिओ व्हायरल..

Malegaon Blast 2008 : मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेले कर्नल प्रसाद पुरोहित कोण आहेत? हिंदुत्ववादी संघटनेशी आला होता संबंध!

SCROLL FOR NEXT