Whitefly observed on sugarcane crop. esakal
जळगाव

Jalgaon Crop Crisis: चोपडा तालुक्यात ऊसावर पांढरी माशी! शेतकरी धास्तावले; उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

Jalgaon News : यावर्षीसुद्धा तालुक्यातील विविध शिवारात उभे असलेल्या ऊसावर पुन्हा पांढऱ्या माशीचा उद्रेक झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता. चोपडा) : चोपडा तालुक्यात पांढऱ्या माशीच्या उद्रेकामुळे कमी झालेले उसाचे उत्पादन शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरले होते. त्यामुळे तालुक्यातील ऊस लागवड गेल्या वर्षापासून कमालीची घटली आहे. यावर्षीसुद्धा तालुक्यातील विविध शिवारात उभे असलेल्या ऊसावर पुन्हा पांढऱ्या माशीचा उद्रेक झाल्याचे दिसून आले आहे. (Jalgaon White fly on sugarcane in Chopda taluka )

चोपडा तालुक्यात साधारणपणे तीन हजार हेक्टरवर कायमस्वरूपी उसाची लागवड अनेक वर्षांपासून दिसून येत होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत गणपूर, भवाळे, लासुर, गलंगी, वेळोदे, धानोरे, घोडगाव आदी शिवारात त्याचप्रमाणे अडावद, मंगरूळ भागातील काही शिवारात ऊसावर पांढऱ्या माशीचा उद्रेक वाढला.

उसाचे उत्पादन एकरी आठ ते दहा टनापर्यंत खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने हे पीक त्या-त्या भागात सोडावे लागले. मात्र, काही शेतकऱ्यांनी फवारणीसाठी पाठ पंप, ड्रोनचा वापर करून पिके वाचविली. सध्यास्थितीत लागवड झालेला ऊस आठ ते दहा पेऱ्यांचा(कांड्यांचा) झाला आहे. (latest marathi news)

उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांनी लक्ष पुरवले त्यांच्या ऊसाची प्रत चांगली असताना आता पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. हा ऊस साधारणपणे आठ ते दहा फुटांचा झाल्याने त्यावर आता रासायनिक कीडनाशकांची फवारणी करणे कठीण झाले आहे. त्यावर क्रायसोपरला कॉर्नियाची अंडी सोडणे हा एकमेव उपाय फक्त उत्पादकांच्या हातात आहे.

मात्र, त्यासाठी साखर कारखाना व ॲग्रो कारखान्यांनी आपापल्या परिसरात असलेल्या उसाची काळजी घेण्यासाठी लवकरात लवकर अंडीच्या डब्या उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलल्यास हे पीक वाचू शकेल. त्यातूनच पुढे बेण्याचा वापर करून ऊस लागवड वाढण्याची अपेक्षा आहे. क्षेत्रात उभा असलेला ऊस कसा टिकून राहील, याकडे परिसरातील साखर कारखान्यांनी व ऊस उत्पादकांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT