couple (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : प्रेमविवाहापूर्वीच युवक, युवती ताब्यात; मेहुणबारे पोलिसांकडून समुपदेशन

Jalgaon : ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झाल्यानंतर एक- दोन भेटीतच परस्परांच्या प्रेमात पडलेल्या युवक, युवतीने पळून जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झाल्यानंतर एक- दोन भेटीतच परस्परांच्या प्रेमात पडलेल्या युवक, युवतीने पळून जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी कोणाला न सांगता पलायनही केले. घरच्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन मेहुणबारे ते चाळीसगाव दरम्यान धावणाऱ्या एका बसमधून दोघांना ताब्यात घेतले. (Jalgaon Young men and women detained before love marriage)

दोन्हीही सज्ञान असल्याने मुलीच्या पालकांना पोलिसांनी बोलावले व मुलीचे समुपदेशन करुन तिला पालकांच्या स्वाधीन केले. बुलढाणा जिल्ह्यातील बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतलेल्या एका तरुणीची ‘इन्स्टाग्राम’वर धुळे येथील एका युवकाशी ओळख झाली. परस्परांशी चॅटिंगचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांच्या भेटी झाल्या.

भेटीतून त्यांच्यातील प्रेम वृद्धींगत झाले. मात्र, दोन्हींच्या कुटुंबीयांकडून विवाहाला विरोध होईल हे ओळखून त्यांनी पळून जाऊन प्रेमविवाहाचा निर्णय घेतला. त्यानुसार, धुळे येथील १९ वर्षीय मुलगा २२ वर्षीय मुलीच्या बुलढाणा गावी पोचला. दोघेही तेथून धुळ्याकडे यायला निघाले.

पोलिसांनी फिरवली चक्रे

मुलीच्या पालकांनी बुलढाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलिसांना मोबाईलच्या लोकेशनवरुन तपास करतांना दोघे संभाजीनगर येथून धुळ्याकडे जात असल्याची माहिती मिळाली.वाहन कोणते हे ट्रेस होत नव्हते. बुलढाणा पोलिसांनी दोन्हींचा माग सुरुच ठेवत सकाळी अकराच्या सुमारास चाळीसगाव ते मेहुणबारे दरम्यान त्यांना ताब्यात घेतले.

बुलढाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. रबडे यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार मिलिंद शिंदे यांना कळवले. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालमसिंग पाटील, मिलिंद शिंदे, गोरख चकोर, प्रकाश कोळी, सुदर्शन घुले, भूषण पाटील, अशोक राठोड, नीलेश लोहार पथकाने नाकाबंदीत दोघांना ताब्यात घेतले.

समूपदेशन

मुलीचे पालकही आले. त्यांनी दोघांना कायद्याची बाजू समजून सांगितली. मुलीचे वय विवाहयोग्य असले तरी मुलाचे वय नसल्याने त्यांचे पोलिसांनी समुपदेशन केले. अखेर मुलीने ती त्या युवकासोबत जाण्यास नकार दिला आणि ती पालकांसोबत रवाना झाली.

"केवळ ‘इन्स्टाग्राम’वर ओळख होऊन तरुण, तरुणीला परस्परांचे आकर्षण वाटणे आणि त्यातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. आम्ही पोलिस म्हणून मुलीचे समुपदेशन केलेले असले तरी पालकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे."- संदीप परदेशी ः सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

Earth : पृथ्वीच्या खाली आहे अदृश्य ढाल; जी सगळ्या संकटांपासून आपल्याला ठेवते दूर, नव्या संशोधनातून रहस्यमय खुलासा, पाहा सविस्तर

Viral Video: पहिल्यांदाच ब्लिंकिटवर ऑर्डर! काकूंची प्रतिक्रिया पाहून नेटकरी झाले फिदा, व्हिडिओ व्हायरल

Kolhapur crime news : इचलकरंजी पोलिसांनी घरफोड्या उघडकीस आणल्या पण एसपींनी पोलिसांचीच चौकशी लावली

Russia–US New START Expiry Explained: भयानक इशारा! रशिया–अमेरिका अणु करार संपला, जग पुन्हा न्यूक्लिअर धोक्याच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT