Rohit Patil
Rohit Patil esakal
जळगाव

Jalgaon News : रंगपंचमी खेळून वाघूर धरणात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; 24 तासांनी सापडला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रायपूर कंडारी (ता. जळगाव) येथील अठरा वर्षीय तरुणाचा सोमवारी (ता.२५) दुपारी वाघुर धरणात बुडाल्याने मृत्यू झाला. रंगपंचमी खेळून झाल्यावर मित्रांसह पोहण्यासाठी वाघूर धरणावर गेल्यावर पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्याने हा तरुण बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रोहित कैलास पाटील (वय १८, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून, औद्योगिक वसाहत पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Jalgaon Youth drowned death in Waghur Dam marathi news)

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे रोहित कैलास पाटील हा तरुण त्याची आई, मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता. रोहित एमआयडीसीतील एका चटई कारखान्यात कामाला होता. सोमवारी (ता.२५) रोजी धुलिवंदन असल्याने ग्रामस्थ आणि तरुणांनी जल्लोषात रंगाची उधळण करत रंगपंचमी खेळली.

रंगपचमी खेळून झाल्यावर आपण पोहण्यासाठी जाऊ म्हणून गावातील काही तरुण पोहण्यासाठी वाघूर धरणावर पोहचले. रोहित पाटील हा देखील मित्रांसह पोहण्यासाठी उतरला. यावेळी त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना अपयश आले. ग्रामस्थांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोहणाऱ्या तरुणांसह रोहितचा शोध घेण्यात आला. अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावण्यात आले. मात्र, अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळे येत होते.  (latest marathi news)

पुन्हा सकाळपासूनच रोहितचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. दुपारी एकच्या सुमारास रोहितचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात यश आले. तातडीने मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांच्यासह वैद्यकीय पथकाने तपासणीअंती त्यास मृत घोषीत केले.

कुटुंबियांचा आक्रोश

रोहित धरणात बुडाल्यापासून त्याच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरु होता. दुपारी मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. जिल्हा रुग्णालयात कुसुंबा ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केल्यावर शविच्छेदन करण्यात आले. मृतदेह दुपारी कुटुंबियांकडे सोपविण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT