Zilla Parishad School Building in the city. esakal
जळगाव

Jalgaon ZP News : शाळाखोल्या दुरुस्तीने शिक्षण घेणे सुसह्य; रावेर तालुक्यात शाळांची स्थिती समाधानकारक

Jalgaon ZP : तालुक्यात मागील वर्षी पावसाळ्यात अनेक शाळांची दुरवस्था झाली होती. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन गळती लागलेल्या शाळांची दुरुस्ती केली आहे.

प्रदीप वैद्य

Jalgaon ZP News : तालुक्यात मागील वर्षी पावसाळ्यात अनेक शाळांची दुरवस्था झाली होती. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन गळती लागलेल्या शाळांची दुरुस्ती केली आहे. परिणामी, खोल्यांची दुरुस्ती झाल्याने व पुरेशे वर्ग उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे ठरणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व उर्दू शाळा खोल्यांची स्थिती चांगली आहे. शनिवारी (ता. १५) शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत होणार आहे. ( zp Studying is tolerable by repairing schoolroom )

तालुक्यातील १५४ शासकीय व ७० अनुदानित, अशा २२४ शाळा आहेत. १५ दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे तांदलवाडी येथील शाळेवर झाड उन्मळून पडल्यामुळे एका खोलीचे नुकसान झाले. ही खोली किचन रूम होती. मात्र, शाळेला अतिरिक्त खोली असल्यामुळे खोलीच्या कमतरतेचा प्रश्न नाही.

शिक्षकांची ५४ पदे रिक्त

तालुक्यात ४८९ शिक्षकांची पदे आहेत. यात ४३५ शिक्षक कार्यरत आहेत, तर ५४ पदे रिक्त आहेत. रिक्त शिक्षकांची पदे भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची गरज आहे. शिक्षकांच्या बदलीसंदर्भात राज्य शासन स्तरावरून कोणतेही आदेश नसल्यामुळे शिक्षक बदलीसंदर्भात कोणतीही भूमिका घेता येणार नाही, अशी माहिती गटरीक्षणाधिकाऱ्यांनी दिली. (latest marathi news)

विद्यार्थ्यांचे होणार जल्लोषात स्वागत

शनिवारी शाळेत स्वच्छता, रांगोळ्या काढून व पताका लाऊन विद्याथ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे वजन, उंची मोजली जाईल व त्यांच्या शारिरिक प्रकृतिविषयी नोंद करण्यात येईल. ३१ हजार ४६३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.

''वर्गसंख्येच्या प्रमाणात तालुक्यात पुरेशा वर्ग खोल्या आहेत. शाळेच्या इमारती सुस्थितीत आहेत. मागील वर्षी शाळा खोल्यांची दुरुस्ती केली आहे. या वर्षी शाळा खोल्या गळणार नाही, अशी स्थिती आहे. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना शाळा खोली गळत असेल, तर अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.''-शैलेश दखने, प्रभारी गटाशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, रावेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT