Teachers Recruitment  esakal
जळगाव

ZP Teacher Recruitment : चाळीसगाव तालुक्यात शिक्षकांची 38 पदे रिक्त; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण

Teacher Recruitment : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सद्यःस्थितीत ३५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

ZP Teacher Recruitment : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सद्यःस्थितीत ३५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी येथील शिक्षण विभागाने घेऊन शिक्षकांना जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत. वर्ग खोल्यांच्या बाबतीत तालुक्यात २६ खोल्या नव्याने मंजूर झाल्या असून काहींचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. तर काही ठिकाणी बांधकाम सुरू झाले आहे. ( 38 posts of teachers are vacant in Chalisgaon taluka )

दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांची दुरुस्ती व डागडुजी करण्याची ज्या ठिकाणी नितांत गरज होती, त्या ठिकाणी ती केली गेली असल्याचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी सांगितले. ज्या शाळांमध्ये नवीन खोल्या किंवा शाळा दुरुस्तीचे काम सुरू आहे.

अशा ठिकाणी विद्यार्थी जाऊ नयेत म्हणून संरक्षणाच्या दृष्टीने बॅरिकेटसह इतर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्या वर्ग खोल्या धोकेदायक आहेत, अशा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये, त्या खोल्यांचे निर्लेखन प्रस्ताव सादर करावेत, अशाही सूचना संबंधिताना दिलेल्या आहेत.

बदल्यांचे प्रस्ताव नाहीत

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शिक्षण सेवकांच्या भरतीमुळे पदवीधर शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. असे असले तरी अजूनही ३८ शिक्षकांची अजून गरज आहे. तालुक्यातील शिक्षक बदल्यांच्या संदर्भात कोणतेही पत्र वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे बदल्यांचे सध्या प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात आले.

पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण

शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व पाठ्‍यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर ती त्या त्या शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात केली होती. त्यानंतर शनिवारी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. यात पहिलीची ५ हजार २६५, दुसरीची ५ हजार ६९७, तिसरीची ६ हजार ६३९, चौथीची ७ हजार ९५, पाचवीची ६ हजार ५८१, सहावीची ७ हजार ३३९, सातवीची ७ हजार २९९ व आठवीची ६ हजार ९६७ पुस्तके आहेत. काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही पुस्तके दिली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी जल्लोषात स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या पद्धतीने प्रवेशोत्सव करण्यात आला. काही शाळांतर्फे गावातून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. काही ठिकाणी गुलाबपुष्प देऊन, औक्षण करुन स्वागत करण्यात आले. याशिवाय काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिष्ठान्न पदार्थ व पुस्तके देखील देण्यात आली.

''यावर्षी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ कशी होईल, यासाठी पहिल्याच दिवसापासून प्रयत्नशील असून, शिक्षकांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने दररोजचे नियोजन देखील देण्यात आलेले आहे.''- विलास भोई, गटशिक्षणधिकारी, चाळीसगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT