road  sakal
जळगाव

जळगावकरांची दिवाळीही खड्ड्यात!

महापौर, आयुक्तसाहेब, पावसाळा गेला... रस्तेदुरुस्ती कधी : नागरिकांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांवरून वावरताना नरकयातना भोगणाऱ्या जळगावकरांना पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे सुरू होतील, असे ‘चॉकलेट’ दाखविले गेले. मात्र, महिना उलटूनही रस्ते दुरुस्तीचे चित्र दिसत नसल्याने जळगावकरांची दिवाळीही खड्ड्यात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापौरांनी महिनाभरापूर्वी रस्त्यांच्या विषयावरून घेतलेल्या बैठकीत पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्ती व नव्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, रस्ते दुरुस्तीची तयारीही सुरू न झाल्याने हे आश्‍वासन ‘चॉकलेट’ ठरले आहे.

रस्त्यांची व्यथा दीर्घकाळाची

जळगाव शहरातील रस्त्यांची व्यथा आज निर्माण झालेली नाही. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरवात झाली. त्याआधीपासूनच काही रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अमृत योजनेच्या सुरू झालेल्या कामांनी रस्त्यांची पूर्ण वाट लावली. शहरातील प्रत्येक रस्ता खोदण्यात आला. पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी एक-दोनदा आणि भुयारी गटार योजनेच्या कामासाठी तिसऱ्यांदा असे तीन वेळा खोदकाम झाले. दुरुस्ती, डागडुजी व चारी भरण्याचे काम मात्र अगदीच तकलादू झाले.

नरकयातनांचे भोगी

गेल्या अडीच-तीन वर्षांपासून जळगावकर नरकयातना भोगताहेत. शहरातील एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. वाहन चालविणे तर दूरच काही रस्त्यांवर पायी जाता येणार नाही इतकी दुरवस्था झालीय. या अवस्थेची जबाबदारी मात्र पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी अथवा योजनेचे कंत्राटदारही घ्यायला तयार नाहीत.

पावसाळ्यानंतरचे ‘चॉकलेट’

रस्त्यांचा विषय ज्वलंत असल्याने त्या संदर्भात महापालिका पदाधिकारी, अधिकारी केवळ बैठकांवर बैठका घेऊन चर्चा करतात. मात्र, त्यातून निष्पन्न काहीत होत नाही. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांची कामे करणे शक्य नव्हते. पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्ती व नवीन कामे सुरू होतील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्यालाही आता महिना उलटला, तरी एकाही रस्त्याच्या कामाला सुरवात झालेली नाही. तात्पुरती डागडुजी करून माती, मुरूम टाकून बुजलेले खड्डे उघडे पडले. खड्डे आणखी फुटभर खोल झाले. मात्र, पालिकेची सुस्त यंत्रणा त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

एकाही रस्त्याचे काम सुरू नसल्याने दिवाळी खड्ड्यातच!

वर्षभरातील महत्त्वाचा व उत्साहाचा सण म्हणून दिवाळीचा उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवापासून रस्त्यांच्या दुरुस्तीला युद्धपातळीवर सुरवात झाली असती तरी दिवाळीपर्यंत बहुतांश रस्ते किमान व्यवस्थित तरी झाले असते. मात्र दिवाळीपर्यंतही एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे यंदाची दिवाळीही जळगावकरांसाठी खड्ड्यातच जाणार आहे.

बेचाळीस कोटी मंजूर, पण...

नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटींचा निधी नगरविकासमंत्र्यांनी कालच्या बैठकीत मंजूर केला खरा, मात्र त्यात नवे काही नाही. याआधीच मंजूर निधीच्या कामांना दिलेली स्थगिती या निर्णयाद्वारे मागे घेतली गेली. प्रत्यक्षात हा निधी मिळतो कधी, त्याची निविदाप्रक्रिया होते कधी आणि रस्ते दुरुस्तीची कामे सुरू होतायत कधी, हे प्रश्‍न आहेतच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT