Abuse of a girl child esakal
जळगाव

Jalgaon : चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट येथे १० वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जळगाव जिल्हा न्यायालयाने शनिवारी (ता. १७) हा निर्णय दिला.(jalgoan child abuse Imprisonment life till death District Court)

जळगाव शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १० वर्षीय गतिमंद मुलीवर सौरभ वासुदेव खर्डीकर (वय २६, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) याने १० जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजता शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडीस आला होता. या संदर्भात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याचा खटला जळगाव न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीची साक्ष व रेखाचित्र काढणारे चित्रकार आणि वैद्यकीय अधिकारी तसेच सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाच्या ठरल्या.

साक्षीपुराव्या अंती न्यायालयाने सौरभ खर्डीकर याला दोषी ठरवत विविध कलमान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि ७० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून किरण पाटील व विजय पाटील यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिल्डरचे पैसे परत करा, गैरव्यवहाराचं पाप ट्रस्टींचं, आचार्य गुप्तीनंदींनी धर्मादाय आयुक्तांनीही केलं आवाहन

Turkey Earthquake : तुर्कीमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, इमारती कोसळल्या अन्...

Kolhapur Municipal Reservation : कोल्हापूर महापालिका आरक्षणाची लॉटरीची तारीख ठरली, खरी राजकीय धुळवड होणार सुरू

Akole News: 'अकोले तालुक्यातील हातातोंडाशी आलेले भात पीक पावसाने हिरावले'; नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : माजी खासदार डॉ हिना गावित यांची आज घरवापसी...

SCROLL FOR NEXT