Jamda (Chalisgaon) : Villagers gathered outside the Gram Panchayat office during Gram Sabha esakal
जळगाव

Jalgaon : जामदा ग्रामस्थांचे अवैध धंद्यांविरोधात कारवाई होत नसल्याने रौद्र रुप

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : जामदा (ता. चाळीसगाव) येथे सोमवारी (ता.२१) ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहावयास मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करून देखील कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केला.

या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना कळताच सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड व सहकाऱ्यांनी धाव घेत कार्यालयात कोंडलेल्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढले.(Jamda villagers Angry because no action is being taken against illegal activities Sarpanch gram sevak locked in office Jalgaon News)

जामदा (ता. चाळीसगाव) येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ग्रामसभा बोलावण्यात आली. त्यातच गावाच्या विकासाच्या प्रश्नांसह अंगणवाडीच्या जागेचा व अवैध धंदे बंद करण्याबाबतचा मुख्य विषय ऐरणीवर होता.

ग्रामसभेत अवैध धंदे बंद करण्याबाबत ठराव मांडण्यात आला. दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा या वेळी नागरिकांचा विशेषत: महिलांचा तीव्र रोष दिसून आला. तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी मांसविक्री बंद करण्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेत महिलांची उपस्थितीत लक्षणीय होती. गावातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली. ग्रामसभेत तसा निर्णय झाल्यानंतर संतप्त महिलांनी रौद्ररूप धारण करीत अवैध धंदे बंद करण्याबाबत यापूर्वीही तक्रार करून देखील काहीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामसभेत उपस्थितीत महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून कुलूप लावून घेतले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

त्यानंतर या घटनेची माहिती नागरिकांनी मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड व सहकाऱ्यांनी जामदा गावात धाव घेतली. या वेळी महिलांनी गावातील अवैध धंदे विशेषत: दारूचे अड्डे तत्काळ बंद करण्याची मागणी केली. निरीक्षक आव्हाड यांनी ग्रामस्थांना बरोबर घेत अवैध दारूविक्रीचे ठिकाण शोधून काढत जवळपास २५० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त करून ते जागेवरच नष्ट केले. अवैध धंदेचालकांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले.

ठरावांना केराची टोपली

ग्रामीण भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या गावठी दारूमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेऊनही दारुबंदीचे ठरावही करण्यात आले आहेत. या ठरावांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात असून, या कारवाया अशाच सुरू ठेवाव्यात, अशी मागणी महिलांमधून होत आहे.

"परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर पोलिसांना तातडीने कळवावे. जेणे करून कारवाई करता येईल. याकामी ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल."

- विष्णू आव्हाड

सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT