jawan from Gudhe died while performing his duty jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : गुढे येथील जवानाचे कर्तव्य बजावताना निधन; उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गुढे (ता. भडगाव) येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलात नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल श्रावण माळी यांचे भारत -बांगलादेश सीमेजवळ पश्र्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे मंगळवारी (ता.२७) देशसेवा बजावत असताना आकस्मिक निधन झाले.

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, त्यांचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीय कोलकता येथे रवाना झाले आहेत. त्यांच्यावर शुक्रवार (ता. ३०) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी सांगितले. (jawan from Gudhe died while performing his duty jalgaon news)

गुढे येथील जवान राहुल माळी (वय ३४) यांचे पश्चिम बंगालमधील कंचनपुरा येथे मंगळवारी (ता.२७) कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन झाले. त्यांचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्याचे मोठे भाऊ अविनाश माळी हे कोलकता येथे रवाना झाले असल्याचे कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते तथा संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान वीर पुत्र राहुल माळी हे १४ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे ते नायक पदावर सेवा बजावत होते. कुंटुबासह ते आर्मी सेंटरमध्ये वास्तव्यास होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बराकपूर येथील आर्मी हॉस्पिटल येथे बुधवारी (ता.२८) शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव आज त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मूळ गावी गुढे येथे शुक्रवारी (ता. २९) रात्री येण्याची शक्यता आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन लहान मुले शिव (वय ४ वर्ष) व शंभु (वय दीड वर्ष), वडील, आई व दोन मोठे भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार असून, प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे ते लहान बंधू आहेत. शुक्रवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात गुढे- जुवार्डी फाट्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, यासाठी ग्रामस्थ व मित्र परिवाराने तयारी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT