st bus esakal
जळगाव

कानळदा, फुपनगरी एसटी बस अद्यापही बंद; विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कानळदा, फुपनगरी व नांद्रा बुद्रूक (ता. जळगाव) येथे एसटी बस (MSRTC Bus) मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. अजूनही एसटी बस सुरू झाली नसल्‍यामुळे विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय होत आहे. जळगाव शहरात ये-जा करण्यासाठी खासगी प्रवासी वाहतूक सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. (Kanalada Phupnagari MSRTC bus still closed jalgaon news)

फुपनगरी येथे जाण्यासाठी सकाळी १०, दुपारी ३ व सायंकाळी सहा वाजता जळगाव आगारातून पूर्वी एसटी बस सोडण्यात येत होती. तसेच कानळदा येथे दिवसभरात आठ फेऱ्यांचे नियोजन होते. तसेच दिवसभरात चार वेळेस नांद्रा बुद्रूक येथेही महामंडळाची बस जायची. परंतु कानळदा व फुपनगरी येथे एसटी बस बंद आहे.

१३० विद्यार्थ्यांची रोज ये-जा

कानळदा व फुपनगरी येथील लोकसंख्या मोठी आहे. कानळद्यात सुमारे १४ हजार तर फुपनगरी येथे सुमारे तीन हजार एवढी लोकसंख्या आहे. यात जळगाव शहरात रोज १३० पेक्षा अधिक विद्यार्थी सकाळी, दुपारी कानळदा व फुपनगरी येथून येतात. तसेच इतर प्रवासी, ज्येष्ठ नागरिक देखील कामानिमित्त जळगाव शहरात येतात. परंतु या सर्व मंडळीला बस सुरू नसल्याने खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. यात प्रवाशांची लूट केली जात आहे. अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.

फाट्यापासून पायपीट

फुपनगरी येथील प्रवाशांना अनेकदा फाट्यावर येऊन खासगी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो. गावापासून फाट्यापर्यंतचे अंतर सुमारे दीड किलोमीटर आहे. एवढे अंतर पायपीट करून जावे लागते. यात वेळ वाया जातो. श्रम अधिक लागतात. विद्यार्थ्यांना वाहनांची प्रतीक्षा करीत थांबावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी एसटी बस फुपनगरी, कानळदा व नांद्रा येथे सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT