KBCNMU
KBCNMU esakal
जळगाव

KBCNMU : उमवित 2 दिवसीय NET SET, PET कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेतर्फे २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान विद्यापीठाच्या सोशल सायन्स प्रशाळेच्या सभागृहात नेट-सेट आणि पेट परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. (KBCNMU State Level Guidance Workshop for 1st Paper of NET SET PET Exam Jalgaon news)

कार्यशाळेचे उद्‌घाटन २२ ला सकाळी साडेदहाला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल.माहेश्वरी यांच्या हस्ते होईल. प्र-कुलगुरू प्रा. ए. टी. इंगळे प्रमुख पाहुणे राहतील. ही कार्यशाळा २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत होईल.

कार्यशाळेत प्रा. डॉ. कमलाकर पायस (तक्षशिला महाविद्यालय, अमरावती), प्रा. डॉ राजेश बोबडे (श्‍यामप्रसाद मुखर्जी महाविद्यालय, शेंदूरजनाघाट, वरूड, जि. अमरावती), डॉ. प्रा. पल्लवी इंगोले (वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी, जि. अमरावती),

प्रा. डॉ. रवींद्र पाटील (या.द.व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तिवसा, जि. अमरावती) मार्गदर्शन करतील. कार्यशाळेचा समारोप २४ फेब्रुवारीला दुपारी साडेचारला होणार असून, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील प्रमुख पाहुणे राहतील.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ही कार्यशाळा सेट-नेट परीक्षेच्या पेपर क्र. १ वर आधारित असून, पीएच. डी. पूर्व प्रवेश (पेट) परीक्षेसाठी देखील उपयुक्त आहे. कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क दीड हजार रुपये असून, निवासी सहभाग नोंदवायचा असेल, तर ५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

तीन दिवस चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या सहभागींना निवास व्यवस्था हवी असेल, त्यांनी सहभाग पत्रामध्ये तसे नमूद करावे. सहभागासाठी http://tiny.cc/Form_NET_SET_PET या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी माध्यमशास्त्र प्रशाळा ८४०७९२२४०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT