illegal weapons use and smuggling sakal
जळगाव

भुसावळ : अवैधरीत्या शस्त्र वापरावर करडी नजर

भुसावळला संशयितांची ओळखपरेड; डीवायएसपींनी घेतली नोंद

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरासह परिसरातील शस्त्र तस्करीला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शनिवारी (ता. २९) शहर पोलिस ठाण्यात ओळखपरेड घेण्यात आली. या वेळी शहर पोलिस ठाणे हद्दीतील ११ तर बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील २१ याप्रमाणे एकूण ३२ संशयितांची हजेरी घेण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या शस्त्र तस्करीच्या घटना वाढल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. याला आळा घालण्यासाठी शनिवारी (ता. २९) सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीचच्या दरम्यान भुसावळ शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे यांच्या हद्दीतील जबरी चोरी त्याप्रमाणेच ज्या संशयितांकडे गावठी कट्टा आणि हत्यारे मिळून आली, अशा संशयितांना बोलावून चौकशी करण्यात आली. या संशयितांकडून इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. याशिवाय त्यांच्याकडून शहरातील अन्य सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांची देखील विचारपूस करून माहिती घेण्यात आली. या विचारपूस मधून काही सक्रिय गुन्हेगारांची नावे उघड झाली असून, त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत.

गुन्हेगारांच्या याद्या तयार

मागील वर्षीच संशयित गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये घरफोडी करणारे आरोपी, जबरी चोरी, वाहन चोरी, देशी कट्टा बाळगणारे, अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयितांच्या या याद्यांमधून आज जबरी चोरी करणारे व शस्त्र अधिनियमाखालील रेकॉर्डवरील आरोपी बोलावण्यात आले होते.

यातील संशयितांना चांगल्या वर्तनाची समज देण्यात आली. तसेच आवश्यक त्यांच्यावर चाप्टर केस देखील करण्यात येत आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पडघण व त्यांच्या अधिपत्याखालील गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Neal Katyal: भारतीय वंशाच्या वकिलाने ट्रम्प सरकारला फोडला घाम, ट्रम्प टॅरिफविरोधात लढणारे नील कात्याल कोण?

 Kolhapur Gokul Milk : ‘गोकुळ’च्या दूधदरवाढीतून उत्पादकांना सात कोटींचा लाभ; नविद मुश्रीफ म्हैस दूध खरेदीत एक, तर गायीसाठी दोन रुपयांनी वाढ

Latur News: जिवंत पत्नीचं काढलं मृत्यू प्रमाणपत्र, दुसऱ्या लग्नासाठी पतीचा प्रताप; अधिकाऱ्यामुळे बिंग फुटलं

Gold Rate Today: 'ट्रम्प इफेक्ट'मुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ; ऐन लग्नसराईत सोनं महागलं, पाहा आजचा ताजा भाव

IND vs PAK: 'हँडशेक न करणं फक्त शो, भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये बंद दारामागे सर्वकाही आलबेल', कोणी केला हा खळबळजनक दावा?

SCROLL FOR NEXT