Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon : अल्पवयीन मुलाचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील खडकी गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे (Minor Boy) अपहरण (Kidnapping) करून पळवून नेल्याची घटना एक जूनला घडली होती. याप्रकरणी अखेर शनिवारी (ता. ४) अज्ञात व्यक्तीविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (kidnapping of minor Jalgaon Crime News)

तालुक्यातील खडकी गावात सचिन अशोक पवार (वय १५) हा मुलगा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. तो १ जूनला सकाळी साडेअकराच्या सुमारास घरात एकटा असताना अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण करून पळवून नेले. सचिनचे वडील अशोक पवार यांनी परिसरात, त्याचे मित्र आणि नातेवाईकांडे शोधाशोध केली. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. अखेर चार जूनला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; 84 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT