Crime News esakal
जळगाव

20 किलोचा घण चालवतो, एकाच घावात संपवला...मारेकऱ्याची कबुली

जळगाव शहरातील कासमवाडीत मच्छीबाजारातील तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्याची हत्या करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील कासमवाडीत मच्छीबाजारात सागर पाटील या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोघा संशयितांना आठ तासांतच पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या चौकशीतून ही घटना, त्यामागची पार्श्‍वभूमी असा खुलासा समोर येतोय..

खुनाच्या गुन्ह्यात आरिफ शहा अयुब शहा आणि शेख जुबेर शेख भिका सिकलीगर अशा दोघांना अटक झाली असून मुख्य मारेकरी आरीफ शहाने खुनाची कबुली देताना ‘वर्कशॉपमध्ये दिवसभर २० किलोच्या घणाचे फटके चालवतो.. तसाच फटका सागरच्या डोक्यातही मारला अन्‌ तो कोसळल्याचे त्याने सांगितले.

सागर पाटील हा २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने जामिनावर सुटला होता. त्याचे इतर साथीदार आणि टोळीचा म्होरक्या चेतन ऊर्फ चिंग्या सुरेश आळंदे जन्मठेपेच्या गुन्ह्यात कारागृहातच आहेत. सागर बाहेर सुटल्याने चेतन आळंदे याचे बाहेरील सर्व कामे अगदी सहजपणे होत होती. त्यात सागरने व्याजाचा धंदा सुरु केला होता. जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आल्याने त्याची बऱ्यापैकी ‘हवा’ जळगाव शहरात होतीच. त्याच्या घराजवळच राहणारे आणि त्याचे मित्र आरीफ शहा अयुब शहा आणि शेख जुबेर शेख भिका सिकलीगर यांच्यासोबत त्याची रोजचीच बैठक असायची. त्यातून पैशाची देवाणघेवाणी झाली. आरीफने सागरकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. पैसे परत करत नाही म्हणून सागरने आरीफच्या घरी गोंधळ घातला. त्याचाच राग आरीफच्या डोक्यात शिरला अन्‌ त्यातून ही हत्या घडली. सागरला कसा मारला, हे आरीफने पोलिसांना इत्यंभूत सांगितले.

या खुनात झाली जन्मठेप

शहरातील गणेशवाडी येथील अंडापाव विक्रेता चंद्रकांत ऊर्फ भैय्या सुरेश पाटील या तरुणाचा १४ मे २०१५ला खून करण्यात आला होता. या खुनाच्या गुन्ह्यात चेतन ऊर्फ चिंग्या सुरेश आळंदे, लखन दिलीप मराठे, सनी उर्फ चालीस वसंत पाटील, ललित ऊर्फ सोनू गणेश चौधरी, लक्ष्मण दिलीप शिंदे व सागर पाटील असे सहा आरोपी होते. जिल्‍हा न्यायालयात दोषारोप सिद्ध होऊन या टोळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली हेाती.

आता जेलमध्ये ‘गँगवार’?

अटकेतील आरीफ शहा शेख जुबेर यांची कोठडी संपल्यावर त्यांची कारागृहात रवानगी होणार आहे. तत्पूर्वीच मृत सागरची कारागृहातील मित्र कंपनी दोघा मारेकऱ्यांच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती बाहेर येत आहे. दोघांना न्यायालयात आणल्यावर विरोधी टोळीतील तरुणांनी न्यायालयात केलेल्या गर्दीतून ही माहिती समोर आली आहे. जन्मठेपेच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या टोळीचा म्होरक्या चेतन आळंदे आतूनच ‘टोळी’ चालवत असल्याचेही सांगण्यात येत असून सागरचा ‘गेम’ करणाऱ्यावर तो नक्कीच लक्ष ठेवून असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT