kirankumar bakale esakal
जळगाव

Kirankumar Bakale Controversial Statement : बकालेंच्या अटकेसाठी मराठा समाज आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतून बडतर्फ करून तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर मराठा बांधवांकडून रविवारी (ता. ९) साखळी आंदोलन करण्यात आले.

जळगाव एलसीबीचे पोलिस निरीक्षक बकाले यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची आडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाने आक्रमक होऊन ठिकठिकाणी कारवाईबाबत आंदोलने केली.

त्यानंतर बकालेंना निलंबित करण्यात आले; परंतु त्यांना सेवेतून बडतर्फ करून तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी बहुतेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे रविवारी मराठा समाजबांधवांनी साखळी आंदोलन केले. या वेळी विविध सामाजिक संस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.(Kirankumar Bakale Controversial Statement Maratha Community ageressive for Arrest Jalgaon News)

तत्पूर्वी पोलिसांनी बकाले यांना तत्काळ अटक करणे गरजेचे होते; परंतु जाणूनबुजून त्यांची पाठराखण केली, असा आरोप समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

या वेळी गणेश पवार, विजय पाटील, खुशाल बिडे, डी. एस. मराठे, सुमीत भोसले, संतोष निकुंभ, संजय कापसे, सचिन स्वार, पंकज पाटील, खुशाल पाटील, भाऊसाहेब पाटील, राजू मोरे, सुनील पाटील, सागर पाटील, राकेश राखुंडे, किशोर पाटील, चेतन वाघ, पप्पू मगर, सुधीर शिंदे, देवेंद्र पाटील, सुदर्शन देशमुख, पंकज रणदिवे, दिनकर कडलग, राजेंद्र शिंदे, सतीश पवार, अनिल पवार, अमोल पवार, बंडू पगार, कुशल देशमुख, नाना कापसे, सुनील गायकवाड, माळशेवगे दीपक पाटील, विनायक मांडोळे, प्रदीप देशमुख, गोकुळ पाटील, विलास मराठे, स्वप्नील गायकवाड, मुकुंद पवार, छोटू अहिरे, दीपक देशमुख, प्रदीप मराठे, नाना तांबे, जी. जी. वाघ, राकेश बोरसे, निवृत्ती कवडे, अनिल कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, मराठा भगिनी जयश्री रणदिवे, प्रतिभा पवार, आरस्ता माळतकर, मीलन देशमुख, रेखा गायकवाड, अनिता दुसिंग, मनीषा गायके, संगीता जाधव, अलकनंदा भवर, मनीषा महाजन, रत्नमाला जाधव, योजना पाटील, मीना पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, धनंजय मांडोळे, माजी नगरसेवक सुरेश स्वार, संजय पाटील, शेखर देशमुख, देवळी माजी सरपंच अतुल पाटील, शेतकरी कृती समितीचे विवेक रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे के. आर. पाटील, डॉ. सुनील राजपूत, ॲड. भागवत पाटील, स्वप्नील जाधव, आरपीआयचे आनंद खरात व आम आदमी पार्टीचे ॲड. राहुल जाधव यांनी आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९० वर्षांची परंपरा आजही कायम! बैलगाडीतून निघालेली गणपती मिरवणूक ठरली खास, भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन संपन्न

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

SCROLL FOR NEXT