death  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : रेल्वेखाली सापडून मजूर ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : डोकलखेडा (ता. पाचोरा) येथील मजूर पाचोरा येथे धावत्या रेल्वेखाली सापडून ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (laborer died due to coming under railway jalgaon accident news)

निजामुद्दीन- हुबळी एक्स्प्रेसखाली सापडून रेल्वे खांब कि.मी. क्रमांक ३७१ /२५ जवळ एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता. रुग्णवाहिका चालक बबलू मराठे यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर रेल्वे पोलिसांनी मृतदेहाच्या वर्णनानुसार संपूर्ण माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली.

त्या माहितीच्या आधारे हा तरुण वाघुलखेडा (ता. पाचोरा) येथील असल्याचे निष्पन्न झाले. सुनील मन्साराम सोनवणे असे मृत तरुणाचे नाव असून, तो पाचोरा येथे कपडे घेण्यासाठी जातो असे सांगून घरून निघाला होता. परंतु उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेतला जात होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोशल मीडियावरील रेल्वे पोलिसांची माहिती पाहून त्यांनी मृतदेह पाहिला व ओळख पटली. मृत सुनील सोनवणे एकुलता एक मुलगा असून, त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

घरातील कर्ता तरुण गेल्याने सोनवणे कुटुंबीय कमालीचे खचले आहेत. रेल्वे दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार ईश्वर बोरुडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT