Jalgaon District Collector Ayush Prasad  esakal
जळगाव

Jalgaon News : जमीनधारकांनी मोबदला स्विकारून राष्ट्रीय महामार्गासाठी ताबा द्यावा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, २११, ७५३- जे, ७५३- एल, ७५३- एफ चौपदरीकरणात जमीन संपादन होणाऱ्या जमीनधारकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी मोबदला रक्कम स्वीकारावी.

संपादित होणाऱ्या जमिनीचा ताबा भूसंपादन अधिकाऱ्यांना द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. (landholders should accept compensation and hand over possession for National Highway jalgaon news)

जमीनधारकांना भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिलेला मोबदला दर व रक्कम मान्य नसल्यास सक्षम वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मूभा आहे. त्यासाठी मोबदला रक्कम स्वीकारली व ताबा दिला आहे म्हणून कोणतीही अडचण राहणार नाही.

लवाद तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाखल लवाद अर्ज प्रकरणी सर्व संबंधितांचे म्हणणे सादर करणेकामी अंतिम संधी म्हणून १३ ऑक्टोंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मुदतीत आलेल्या लेखी म्हणण्याच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादींचे म्हणणे व त्यामध्ये मतभेदाचे मुद्दे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

यामुळे हे कामकाज पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. वादी व प्रतिवादींचे म्हणणे प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकत असल्यास लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक राहिल. त्यानंतर संधी देण्यात येऊन त्यासाठी मुदत जाहीर करण्यात येईल. पुरेशी संधी देण्यात येऊन दोन्ही बाजूच्या मुद्यांची लेखी स्वरूपात समाधानकारक पूर्तता झाल्यानंतरच निकाल जाहीर करण्यात येईल. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: पावसामुळे उद्या शाळांना सुट्ट्या; ठाण्यात सुट्टी जाहीर, मुंबईचं काय?

AI Project Revive : आता मृत प्रियजनांशी साधता येणार संवाद , AI ची कमाल, तंत्रज्ञानाबाबत ऐकून वाटेल आश्चर्य

Heavy Rainfall: निसर्ग कोपला, बळीराजाच्या डोळ्यात पाणी; पिकांच्या जागी साचला गाळ, नद्या नाले फुगले

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरची डोकेदुखी तीन खेळाडूंमुळे वाढली, एका जागेसाठी चुरस रंगली! पुन्हा एकदा ऑलराऊंडर बाजी मारणार?

Weekly Love Horoscope : शुक्र-बुध ग्रहाची युती! 'या' 3 राशींच्या लोकात वाढेल प्रेम अन् 'या' 2 राशींच्या नात्याला त्रास

SCROLL FOR NEXT