married woman  sakal
जळगाव

Latest Marathi News : Bullet घेण्यासाठी विवाहितेचा छळ; 7 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : दुचाकी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेचा विवाह ऑगस्ट २०२१ मध्ये युक्रांत दिलीप बोरसे (रा. शिरपूर, जि. धुळे) नामक व्यक्तीशी झाला. सुरवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेला चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर दुचाकी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये, असे सांगून शारीरिक व मानसिक छळाला सुरवात केली.

आई-वडिलांची हालाखीची परिस्थिती असल्याने तिने नकार दिला. त्यावर सासरच्या मंडळींकडून अधिक त्रास दिला जाऊ लागला. या सगळ्या गोष्टींना कंटाळून पीडितेने शहर पोलिस ठाणे गाठून पती युक्रांत दिलीप बोरसे, सासू भारतीबाई दिलीप बोरसे, सासरे दिलीप यशवंत बोरसे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार किशोर सोनवणे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT