Lemons for sale in the market.
Lemons for sale in the market. esakal
जळगाव

Lemon Price Hike : वाढत्या मागणीने लिंबू खातोय भाव! शेतकऱ्यांमध्ये समाधान

सकाळ वृत्तसेवा

वावडे (जि. जळगाव) : काही दिवसांपूर्वी दहा रुपयांत दहा ते पंधरा नग मिळणाऱ्या लिंबांना आता मोठी मागणी आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच त्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात लिंबू शिल्लकच राहत नसल्याने विक्रेत्यांकडून लिंबू चढ्या दराने विकले जात आहेत.

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. सरबत विक्रेते, तसेच रसवंतीगृहचालकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली असून, घाऊक आणि किरकोळ बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एका लिंबाची विक्री पाच ते सात रुपयांना विक्री केली जात आहे. (Lemon Price Hike Satisfaction among farmers jalgaon news)

शेतकऱ्यांना फायदा

भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत असून, त्यांच्या मालाला दोन पैसे जास्त मिळत आहेत; परंतु यामुळे सामान्य ग्राहकांना मात्र भाववाढीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबांना मोठी मागणी असते. लिंबूसरबत गुणकारी असल्याने खाण्यातही लिंबू मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतो.

याशिवाय रसवंतीगृहे, ज्यूस सेंटर आदी ठिकाणी लिंबू जास्त वापरला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वच स्तरातून लिंबूंची मागणी वाढत असल्याने भाववाढ ठरलेली असते. बाजारातही लिंबू विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे.

अगदी लहान लिंबूही पाच रुपयास एक मिळत आहे. उत्तम प्रतीच्या लिंबांना तर जास्त मागणी आहे. दरम्यान लिंबांची किंमत वाढल्याने त्याच्याशी संबंधित शितपेयांच्या किमतीही आपोआपच वाढल्या आहेत.

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दर वाढल्यामुळे येत्या काही दिवसात लिंबू अजून महागणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मे महिना संपेपर्यंत तरी हेच चित्र बाजारात राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांत झालेल्या आवकाळी पावसामुळे लिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जोरदार पावसाने लिंबू फळांची गळ झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

रोगप्रतिबंधक लिंबू

लिंबाचे अनेक फायदे असून, मानवी शरीराला लिंबू आवश्यक अशी गोष्ट आहे. लिंबात जीवनसत्त्व सी असल्यामुळे ते शरीराला पोषक असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिंबामुळे निर्जंतुकीकरण होत असल्याने भाज्यांमध्ये व अन्य पदार्थांमध्ये लिंबू मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

रोजच्या जेवणात लिंबू वापरल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. बऱ्याचदा अपचन झाल्यासही लिंबाचा रस घेतला जातो. उन्हाळ्यातही लिंबूसरबत नियमित घेतल्यास ते गुणकारी ठरते.

लिंबाला वर्षातून दोन ते तीन वेळा बहर येतो. मात्र, त्यातील सर्वच बहार हाती लागत नाही. पावसाळ्यात येणारा बहारातून फारसे उत्पन्न मिळत नाही. उन्हाळ्यात मात्र लिंबास जास्त मागणी असते.

यंदा मात्र उन्हाळ्याच्या सुरवातीलाच ढगाळ वातावरणाने लिंबू उत्पादकांना फटका बसून मागणी घट झाली. आता मात्र गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा चटका जाणवू लागताच लिंबांच्या मागणीतही कमालीची वाढ झाली आहे.

"अवकाळी पावसामुळे लिंबांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. मात्र असे असले तरी सध्याच्या भावामुळे समाधानकारक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे."

- मालती बोरसे, शेतकरी, वावडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT