leopard cub reference image esakal
जळगाव

Jalgaon News : पाटणा शिवारात आढळले बिबट्याचे बछडे; वन विभागाने केला परिसर निर्मनुष्य

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील पाटणा शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. या शेतातील ऊसाच्या फडात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. हा प्रकार सोमवारी (ता. १२) सकाळी उघडकीला आला. त्यानंतर लागलीच वन अधिकारी शीतल नगराळे यांनी शेतकऱ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क करून परिसर निर्मनुष्य केला. मात्र घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल होण्याअगोदर मादीने दोन्ही बछडे उचलून नेले. (Leopard cub found in Patna area forest department cleared area Latest Jalgaon News)

तालुक्यातील वलठाण येथील शेतकरी कल्पेश गोरखनाथ राठोड यांची पाटणा शिवारात गट क्रमांक १७२ शेतजमीन आहे. यात त्यांनी उसाची लागवड केली होती. त्यामुळे त्यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. मात्र ऊसतोडणी सुरू असताना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ऊसतोड कामगारांना ऊसाच्या फडात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागाला कळविले. त्यानंतर चाळीसगाव वन परीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी शेतकऱ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क केला आणि परिसर निर्मनुष्य करण्याच्या सूचना केल्या.

लागलीच त्या आपल्या शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोचल्या. मात्र, तोपर्यंत बिबट्याचे दोन्ही बछडे मादीने उचलून नेले असल्याचे कळाले. तत्पूर्वी ऊसतोड कामगारांना मादीचे दर्शन घडल्याचे सांगण्यात आले. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्याअगोदर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला असून, पुन्हा ऊसतोड कामगारांनी उसतोडणीला सुरवात केली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

"या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केल्यानंतर त्यांना परिसर निर्मनुष्य करण्याबाबत सूचना केल्या. मात्र शेतात पोचण्याअगोदर मादीने दोन्ही बछडे नेले. त्यामुळे परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून, कोणालाही बछडे आढळून आल्यास त्यांनी ते हाताळू नये, सेल्फी काढू नये, तातडीने वन विभागाशी संपर्क करावा."
- शीतल नगराळे, वनपरीक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT