drinking Alcohol  esakal
जळगाव

देशीचे गोदाम फोडून विदेशीवर उडवला पैसा; चोरट्यांची टोळी गजाआड

महागड्या वस्तूंवर आणि विदेशी ब्रॅंण्डच्या दारुच्या पार्ट्यां करत असल्याच्या संशयातून पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनीतील देशी दारुचे गोदाम फोडणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांनीच हे दुकान फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरीच्या पैशांतून महागड्या वस्तूंवर आणि विदेशी ब्रॅंण्डच्या दारुच्या पार्ट्यां करत असल्याच्या संशयातून पोलिसांना सुगावा लागल्याने तिघांना अटक झाली. (Liquor shop thieves arrested in jalgaon)

देवेंद्रनगरातील रहिवासी भूपेश कुळकर्णी (वय ३८) यांच्या मालकीचे देशी दारुचे दुकान आणि गोदाम सुप्रिम कॉलनी गजानन बाबा कॉलनी परिसरात आहे. २५ मार्च रोजी कुळकर्णी यांचे गोदाम फोडून चोरट्यांनी २ लाख १५ हजार ५१० रुपये किमतीचा माल चोरला होता. एमआयडीसी पोलिसांत दाखल या गुन्ह्यात निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील इम्रान सैय्यद यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, सचिन पाटील, निलोफर सैय्यद अशांच्या पथकाने अमन ऊर्फ खेकडा रशिद सैय्यद (वय २०), उमेश ऊर्फ भावड्या संतोष पाटील (वय १९), शेबी खान चाँदखान (वय १९, तिघे रा. सुप्रीम कॉलनी) अशांना ताब्यात घेण्यात आले.

पैशांचा उधळमाप अन्‌ सरळ जेल

मार्च माहिन्यात गोदाम फोडल्यानंतर बऱ्यापैकी पैसा हातात आल्यावर तिघांनी महागड्या वस्तू खरेदीचा सपाटा लावला होता. चांगले कपडे, मोबाईलसह इतर शानशौकीवर पैसा उडवत असल्याची भनक पोलिसांना लागली, पोलिसांनी खबऱ्यांना टोळीत घुसवल्यावर सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT