Faizpur: MP Raksha Khadse and others while visiting the labor movement of 'Masaka' and getting to know the feelings of the workers
Faizpur: MP Raksha Khadse and others while visiting the labor movement of 'Masaka' and getting to know the feelings of the workers esakal
जळगाव

Jalgaon News : घामाचे पैसे द्या, अन्यथा कारखान्याना बंदच

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर (ता. यावल) : येथील मधुकर साखर कारखान्याच्या कामगारांचा घामाचा पैसा मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, या भूमिकेवर आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील कामगार ठाम होते. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. या वेळी अनेकांनी आंदोलनाला भेटी देऊन पाठिंबा दिला.

कारखाना विक्री झाल्यानंतर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र अद्यापही कामगारांच्या थकीत देणी मिळण्याविषयी अस्पष्टता आहे. म्हणून मधुकरच्या कामगारांनी त्यांची थकीत देणी मिळण्यासाठी काल सोमवारपासून (ता. २६) कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. (Madhukar Sugar Factory workers do agitation against pending payment jalgaon news)

जोपर्यंत कामगारांची ५२ कोटी थकीत देणी मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, या भूमिकेवर आंदोलक दुसऱ्या दिवशीही ठाम होते. कारखाना विक्रीची निविदा प्रक्रिया व करारनामा याविषयी जिल्हा बँकेने माहिती द्यावी, अशी कामगारांची मागणी आहे. यासाठी आज जिल्हा बँकेचे एमडी देशमुख व जीएम एम. टी. चौधरी यांनी आंदोलनस्थळी येऊन कारखाना विक्रीची ऑनलाइन टेंडरविषयी माहिती दिली.

तसेच कामगारांची थकीत देणी ज्यांनी कारखाना घेतला त्यांची असल्याचे स्पष्ट केले. या वर उपरोक्त पूर्ण लेखी खुलासा बँकेने करावा व कामगारांची देणी आत्ताच मिळावी, अशी मागणी कामगारांनी केली. यावेळी कारखाना विक्रीची कागदपत्रे द्या, असे बँकेला कळविले असल्याचे कारखान्याचे प्रशासक व्ही. एम. गवळी यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

त्याचप्रमाणे बँकेने कारखाना विक्रीसंदर्भात सर्व प्रकारची माहिती प्रसिद्ध करावी व कामगार शेतकरी प्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी मसाका माजी संचालक नरेंद्र नारखेडे केली. दरम्यान दुपारी खासदार रक्षा खडसे यांनी आंदोलनाला भेट दिली. चर्चेअंती त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क केला. दरम्यान, उद्या सकाळी शेतकरी प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी, माजी संचालक मंडळ प्रतिनिधी जिल्हा बँकेचे पदाधिकारी यांची बैठक कारखान्याच्या सभागृहात होणार आहे. या बैठकीतून काय मार्ग निघणार व कामगारांची थकीत देणी अदा करण्याची जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट होईल.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, मंत्री गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख, जिल्हा दूध संघ संचालक नितीन चौधरी, नारायण पाटील, माजी नगराध्यक्ष नीलेश राणे,भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, दिलीपसिंग पाटील, विजय पाटील, मनसे जिल्हा संघटक चेतन अढळकर, शेतकरी प्रतिनिधी राकेश फेगडे आदींनी आंदोलनाला भेट पाठींबा दिला. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. आंदोलनात राष्ट्रीय कामगार संघ अध्यक्ष किरण चौधरी, सेक्रेटरी सुनील कोलते, माजी अध्यक्ष गिरीश कोळंबे, एकनाथ लोखंडे, उपाध्यक्ष दामू कोळंबे, उपाध्यक्ष हेमंत इंगळे, ज्ञानदेव जावळे, युवराज चौधरी यांच्यासह शेकडो कामगार व शेतकरी सहभागी झाले आहे.

लपवाछपवी कशासाठी? : अमोल जावळे

कारखाना विक्री करणे, हाच एकमेव पर्याय होता का? तसेच याची विक्री करत असतांना लपवाछपवी कशासाठी करण्यात आली?, असा सवाल अमोल जावळे यांनी उपस्थित केला. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचे संकेत दिले असताना अमोल जावळे यांनी देखील जिल्हा बँकेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवले आहे व कामगारांच्या आंदोलनाठिकाणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT