Pandit Pradeep Mishra narrating the story of Shiva Mahapuran. A crowd gathers for Pandit Pradeep Mishra's story, which continues in Bade Jatadhari Mahadev Mandir area near Vadnagari Fatya near the city. esakal
जळगाव

Maha Shivpuran Katha : अभ्यासक्रमात रामायण, महाभारत, गीतेचा समावेश करावा : पंडित प्रदीप मिश्रा

सकाळ वृत्तसेवा

Maha Shivpuran Katha : भारतीय पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमांत बाबर, औरंगजेब यांचा इतिहास शिकवला जातो. केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारने पुढील वर्षापासून पाठ्यपुस्तकांमध्ये गीता, रामायण, महाभारत यांचा समावेश करावा, अशी अपेक्षा पंडित प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली.(maha shivpuran katha Pandit Pradeep Mishra guidance of Ramayana and Mahabharata Gita should included in study jalgaon news)

जळगाव शहरालगत कानळदा मार्गावरील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात पंडित मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरू आहे. शुक्रवारी (ता. ८) चौथ्या दिवसाच्या निरूपणात मिश्रांनी मुलांवरील संस्काराचा उल्लेख केला.

आपण लहान असताना शिक्षक गोमातेवर निबंध लिहून आणायला सांगायचे. मात्र आता गोमातेला अभ्यासातून दूर केले आहे. सध्या नेत्यांवर, काही ठराविक स्थळांवर निबंध लिहायला सांगितले जातात.

आपली संस्कृती, सनातन धर्माविषयीची माहिती मुलांपासून जाणीवपूर्वक दूर केली जात आहे. येणाऱ्या वर्षात केंद्रातील सरकारने पाठ्यपुस्तकांत रामायण, महाभारत, भगवतगीतेचा समावेश करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

भक्त शिवाच्या हृदयात

भगवान शिवाचा महिमा मिश्रांनी आज वेगळ्या पैलूने उलगडून सांगितला. आपल्याकडे काही सोहळा असेल, त्याच्या पत्रिका वाटायच्या असतील, तर आपण नावांची यादी करतो. जी जवळची मंडळी आहे, त्यांची नावे लिहायची गरज आपल्याला पडत नाही. मात्र, जे कधीतरी भेटतात, त्यांची यादी करून आपण पत्रिका देतो.

देवतांमध्येही जवळपास सर्वच देवतांकडे भक्तांची यादी असलेली डायरी असते. मात्र, महादेव एकमात्र देव आहे की, त्यांच्या हृदयात सर्वच भक्तांची नावे आहेत. त्यामुळे शिवाची निस्सिम भक्ती करायला हवी. कथेच्या निरुपणात त्यांनी आज कामदेशचे राजा सुदक्षण व त्यांची पत्नी सुदक्षणा यांच्या शिवभक्तीची गोष्ट सांगितली.

भीती दाखवून भक्ती नको

शिवमहापुराण कथेसाठी कोणत्याही भक्ताला जबरदस्तीने किंवा भीती दाखवून बोलावलेले नाही. शिवाची भक्ती करणारे भक्त स्वत:च्या इच्छेने, एका संकल्पाने, निर्धाराने येथे आले आहेत. भीती दाखवून केलेली सक्ती फार काळ टिकत नाही, असेही पंडित मिश्रा म्हणाले.

वर-वधू बघताना देवालयाचे दर्शन घ्या

आई-वडील आपल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी अनुरूप स्थळ बघायला जातात. त्या वेळी सर्व प्रकारची विचारपूस, चौकशी करतात. मुलगी असेल, तर तिचे गुण, तिच्या सवयी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, सुशील हे बघितले जाते. मुलगा पाहायचा असेल, तर त्याची नोकरी, घर, संपत्ती, पॅकेज बघितले जाते. मात्र, वर-वधूचा शोध घेताना त्यांच्या घरचे देवायलय कसे आहे, ते भक्ती करतात की नाही, हेही आवश्यक पाहा, असेही ते म्हणाले.

चॉकलेट वाटणारी भगिनी

जळगावात एका भगिनीच्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलताना पंडित मिश्रा म्हणाले, ही भगिनी स्वत:च्या पोटावर पोटली बांधून फिरतेय. त्यात चॉकलेट आहेत. जे कुणी तिला रस्त्यात भेटेल त्याला ती ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम्‌’ म्हणायला सांगते.

ज्याने म्हटले, त्याला एक चॉकलेट देते, असे दिवसभरात ती १००८ चॉकलेट वाटतेय. आपणही आपल्या दारी कुणी भिक्षा मागायला आले, तर भिक्षा देण्याआधी त्याला ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम्‌’ अथवा ‘ॐ नम: शिवाय’ म्हणायला सांगा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice Presidential Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती निवडणुकीवर आता आणखी एका पक्षाने टाकला बहिष्कार अन् कारणही सांगितलं!

Nepal PM KP Sharma Oli : नेपाळच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा! ; 'पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर, सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही'

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT