Mahant Sarjudas Maharaj esakal
जळगाव

Jalgaon News : भिलवाडात महंत सरजूदास महाराज अटकेत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील तपस्वी हनुमान मंदिरात अनेकवर्ष वास्तव्य असलेल्या आणि हजारो भाविकांचे आस्था असणारे महंत सरजूदास महाराजांना राजस्थानच्या भिलवाडा पोलिसांनी २८ डिसेंबरला अटक केली.

भिलवाडा येथील घोडास आश्रमात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार आणि तिच्या आईवर ॲसिड हल्ला केल्याचा सरजूदास यांच्यावर आरोप आहे. आश्रमातून ताब्यात घेतल्यावर काहीतरी वस्तू चावून खाल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अटक करण्यात आली. दोन वेळेस गुन्ह्याच्या तपासाधिकारी तथा पोलिस अधीक्षक चंचल मिश्रा यांनी संशयित सरजूदास यांची पोलिस कोठडी मिळविली आहे.(Mahant Sarju Das Maharaj arrested in Bhilwara Jalgaon News)

पथक जळगावात

जळगाव शहरात सुमारे १० ते १५ वर्षांपासून शाहूनगरमधील तपस्वी हनुमान मंदिरात सरजूदास महाराजांचे वास्तव्यास होते. (४४१/२०२२) कलम-३७६ बालकांचे लैगिक अत्याचार अधीनियम-२०१२च्या कलम ३ व ४ अन्वये दाखल गुन्ह्यात संशयित सरजूदास मूर्तीदास साकेतवासी २२ दिवस फरारी राहिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पहिल्या वेळेस चार दिवस व नंतर वाढीव पोलिस कोठडी पोलिसांनी मिळविली. तपासात पीडितेच्या अंगावरील कपडे, संशयिताच्या अंगावरील कपडे जप्त करण्यात आले. पुराव्यांचे संकलन पोलिस अधीक्षक चंचल मिश्रा यांच्यातर्फे करण्यात आले.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आणि संशयिताविरुद्ध इतर गुन्हे दाखल आहेत काय?याची माहिती घेण्यासाठी मिश्रा यांच्या पथकातील उमेश कुमार, प्यारचंद जळगावात आले होते. त्यांनी दुपारी एकला जळगाव शहर पोलिस ठाण्यात आल्याची नोंद करून तपासाला सुरवात केली आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

जळगावच्या तरुणावर दबाव

अल्पवयीन पीडितेवर अत्याचाराचा गुन्हा आपल्या अंगावर घ्यावा, यासाठी जळगावातील रहिवासी तथा आश्रमाशी जोडला गेलेल्या तरुणावर प्रचंड दबाव आणला जात होता. घडलेली घटना व अत्याचाराला हाच तरुण जबाबदार असल्याचे भासवून त्याचे नाव गुंतवण्यासाठी भिलवाडासह जळगावातील काही मंडळी सक्रिय असल्याने या तरुणाची भिलवाडा (राजस्थान) येथील मंडल पोलिस ठाण्यात सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. त्याच्या मोबाईलसह इतर तपासण्या करण्यात येऊन जबाब नोंदवून त्या तरुणाचा सहभाग नसल्याची खात्री झाल्यावर त्याला मुक्त करण्यात आले.

कोण आहेत चंचल मिश्रा?

चंचल मिश्रा राजस्थान केडरच्या आयपीएस अधिकारी असून, त्यांनी आसाराम बापू यांना २०१४ मध्ये अटक केली होती. आसाराम बापूविरुद्ध २०१३ मध्ये जोधपूर (राजस्थान) येथे पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असताना, त्यांची नियुक्ती जोधपूर येथे झाली. त्यांनी तपास हातात घेऊन तो वेळेत पूर्ण करत दोषारोपपत्र जोधपूर जिल्‍हा न्यायालयात दाखल केले. त्याच आधारावर आसाराम बापू यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याच चंचल मिश्रा यांनी घोडास आश्रम (भिलवाडा,राजस्थान) येथील महंत सरजूदास यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Warship Attack: इराणच्या दुसऱ्या जहाजाची मदतीसाठी साद; श्रीलंकेकडे प्रवेशासाठी मागितली परवानगी, वाटाघाटी सुरू

MP Dr. Kalyan Kale : युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकलेले जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे मायदेशी परतले

Sangli Shivaneri Bus : सांगली-पुणे मार्गावर धावणार शिवनेरी; राज्यात २०० व्होल्व्हो बस; ‘एसटी’चा ताफा मुंबई-पुणेबाहेर घेणार धाव

US-Israel-Iran War: अमेरिका, इस्राईलसाठीच होर्मुझची सामुद्रधुनी बंद; इराणचा निर्णय, तेल आयातीत भारताला दिलासा

Jyoti Waghmare Success Story : आमची ज्योती आता खासदार होणार! प्रा. ज्योती वाघमारे यांच्या आई-वडिलांनी दाटलेल्या कंठाने व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT