Employees during agitation.  esakal
जळगाव

Mahavitaran Worker Protest : कार्यकारी अभियंत्यांशी बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

Mahavitaran Worker Protest : महावितरण कंपनीने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या नियमबाह्य असल्याने कामगारांनी प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

सहाव्या दिवशी कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांनी चर्चेला बोलावले. मात्र, चर्चेतून काहीही सकारात्मक निष्पन्न न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगार महासंघाने केला. (Mahavitaran Workers Protest Labor Federation decided to continue agitation jalgaon news)

दरम्यान, आंदोलन पुढील काळात तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रशासकीय व विनंती बदल्यांसंदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक ५१४ मध्ये नमूद आहे. मात्र, या परिपत्रकाला महावितरण जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले.

या परिपत्रकात बदल्यांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञपदाच्या १५ कर्मचारी आणि तंत्रज्ञपदाच्या चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमबाह्य करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या मुजोर व मनमानी पद्धतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, महावितरणच्या कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले. त्या वेळी मागण्यांसंदर्भात सांगण्यात आले. मात्र, त्यावर प्रशासनातर्फे ठोस व सकारात्मक आश्‍वासन मिळाले नाही.

त्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्याचा कामगार महासंघाने निर्णय घेतला आहे. पुढील काळात कामबंद आंदोलन किंवा असहकार आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT