Death News esakal
जळगाव

आईने दार उघडताच...दिसला मुलाचा मृतदेह; कौटुंबीक कलहातून एकाची आत्महत्या

हरिविठ्ठलनगरातील धनगरवाड्यात कौटुंबीक कलहातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : हरिविठ्ठलनगरातील धनगरवाड्यात कौटुंबीक कलहातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश बडगुजर असे मयताचे नाव असून रामानंदनगर पोलिसांत याप्रकरणी अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठलनगरातील धनगर वाड्यात गणेश आत्माराम बडगुजर (वय ४८) कुटूंबीयांसह वास्त्यास आहेत. ते इंडिया गॅरेज येथे कामाला होते. गणेश बडगुजर यांच्या लहान मुलीचे लग्न झाल्यानंतर साधारणत: दोन महिन्यापासून कुटुंबात कटकटी सुरु झाल्या होत्या. पती-पत्नीच्या वाद वाढायला नको म्हणून पत्नी प्रतिभा बडगुजर कंटाळून मोठ्या मुलीकडे रहायला गेल्या होत्या. तिथून त्या जैन इरिगेशन येथे कामाला जात होत्या. त्या मोठ्या मुलीसोबत घरी आल्या होत्या. गणेश यांच्यासह बहीण व आई घरीच होते. यावेळी पुन्हा वाद निर्माण होउन भांडणाला सुरवात झाली. गल्लीतील लोकांनी बडगुजर दाम्पत्यास समजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र, पत्नी व मोठी मुलगी १० वाजता घरातून निघून गेली. या पाठोपाठ मृताची आई व बहिण ही घरातून बाहेर गेल्याने घरात कोणीही नसताना गणेश यांनी गळफास घेतल्याची घटना घडली. बहिणीला सोडून आल्यानंतर मृताची आईने दार उघडताच घरात छोट्याशा दोरीने मुलगा गणेश याने गळफास घेतल्याचा अवस्थेत दिसला, यावेळी आईने एकच आक्रोश केला. शेजाऱ्यांसह गल्लीतील रहिवासी मदतीला धावून आल्यावर त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. गणेश बडगुजर यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT