Money esakal
जळगाव

3 स्टार हॉटेलात 2 महिने जेवणासह रिचवली दारू; पैसे मागताच पसार

पुण्यातील कंपनीच्या कथित मॅनेजरचा प्रताप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील हॉटेल महिंद्रामध्ये तब्बल दोन महिने वास्तव्य. या काळात जेवणासह दारूही रिचवली. मात्र हॉटेलचे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचे बिल न देता हॉटेलमालकाची फसवणूक करून कथित पुण्यातील कंपनीचा व्यवस्थापक पसार झाल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित व्यवस्थापक मयूर अशोक जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Manager absconding after cheating in Mahendra Hotel jalgaon)

पैशांसाठी तगादा लावताच पसार

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अजिंठा चौकातील नामवंत थ्री स्टार हॉटेल महिंद्रा येथे १४ फेब्रुवारी ते १६ एप्रिलदरम्यान मयूर अशोक जाधव (रा. फ्लॅट नं. ४, श्रीगणेश ऑर्किड, गंगापूर रोड, रामेश्वरनगर, आनंदवली, नाशिक) याने पुण्यातील एका कंपनीत व्यवस्थापक असल्याचे सांगत बस्तान मांडले होते. वास्तव्यास असलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत हॉटेल कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला. चविष्ट जेवणासह महागडी दारू रिचवली. तो राहत असलेल्या काळात त्याच्या नावाने हॉटेलचे एक लाख ८९ हजार ५९० रुपये बिल झाले. बिलासाठी हॉटेल व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनी त्याला तगादा लावला असता, मयूर जाधव याने बिलाच्या रकमेचा धनादेश दिला. मात्र, तो वठलाच नाही. त्यानंतरही मयूरकडे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी बिलाबाबत पुन्हा तगादा लावला.

दरम्यान, १६ एप्रिलला मयूर जाधव हॉटेलातील खोलीची चावी सोबत नेत पसार झाला. मयूर जाधव याने फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर हॉटेलमालक तजेंद्रसिंग अमितसिंग महिंद्रा (वय ६५, रा. जुनी जैन कंपनी, निमखेडी रोड, जुना हायवे रोड, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून मयूर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक इम्रान सय्यद तपास करीत आहेत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Farmer : इमानदार श्वानांची धाडसी कहाणी! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे प्राण वाचले, कुत्र्यांनी हल्ला करताच बिबट्याने...

U19 IND vs PAK: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात रोखण्यात पाकड्यांना यश; पण आयुषच्या प्रहाराने झाले बेजार; चौकार- षटकारांची बरसात

Latest Marathi News Live Update: आपण सारे महाराष्ट्राची विचार करणारे लोक- देवेंद्र फडणवीस

Hacking Tips : तुमच्या मोबाईल स्क्रीनवर 3 रंगीत ठिपके बघितलेत का? फोन हॅक झालाय का पाहायचं असेल तर 'हे' एकदा चेक कराच

मनपा निवडणुकीबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर! राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात? आचारसंहिता होणार लागू

SCROLL FOR NEXT