mango sakal
जळगाव

कैरी बाजाराला सुरवात; अपेक्षीत ग्राहक नसल्याने व्यापारी चिंतेत

येत्या काळात कैरीला अजून मागणी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा (जि. जळगाव) : मागील आठवड्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कैरी बाजाराला सुरवात झाली. या रविवारी (ता. १२) काही तुरळक ग्राहकांनी कैरी विकत घेतली. बाजारात बारमासी, राजापुरी, करण, सरदार व गलगप्पा अशा जातीच्या कैरी आल्या आहेत. मात्र, ग्राहकांची लोणच्यासाठी सरदार कैरीला जास्त पसंती दिसून आली.

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीमुळे कैरी बाजार बऱ्याच वेळा अमळनेर रस्त्यावर, भोकरबारी शिवारात किंबहुना ज्या ठिकाणी ग्राहक असतील अशा ठिकाणी भरविला जात होता. आता परिस्थिती सुधारली असून शासनाने सर्वत्र मोकळीकतेचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदा कैरी बाजाराचा व्यवसाय चांगला होईल, या आशेने व्यावसायिकांनी मृग नक्षत्रातच कैरी विक्रीस सुरवात केली आहे. मात्र ग्राहकांअभावी व्यापाऱ्यांची कैरी पाहिजे तशी विकली जात नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. पाऊस पडल्यानंतरच कैरीचे लोणचे केले जाते. त्यामुळे येत्या काळात कैरीला अजून मागणी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आठवडे बाजारातील कैरीचे भाव (प्रतिकिलो)

बारामाशी ३० रुपये
राजापुरी ४० रुपये
गलगप्पा ४० रुपये
सरदार ५० रुपये
करण ५० रुपये

बाजारात मंदीचे सावट

कैरी बाजाराला सुरवात झाली असून लोणच्यासाठी लागणारा मालमसाला व इतर साहित्य यांचे दुकाने बाजार समितीच्या आवारात लागतात. मात्र पुरेसे ग्राहक नसल्याने या बाजारातही मंदीचे सावट आहे. यावेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता पावसाअभावी बाजारात मंदी असून यावर्षी चांगला व्यवसाय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT