Flowers showered on Manoj Jarange Patil. In the second photograph, Ganesh Pawar, Laxman Shirasath and office bearers are publicly felicitating him by the whole Maratha community. esakal
जळगाव

Manoj Jarange Patil Jalgaon : आरक्षण असलेल्या मराठ्‍यांनी आरक्षण नसलेल्यांच्या मदतीला धावून जावे.. मनोज जरांगे यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Jalgaon : ‘आरक्षण असलेल्या मराठ्‍यांनी आरक्षण नसलेल्यांच्या मदतीला धावून जावे, तेच आपल्याला उद्या तारणार आहेत. तेव्हा आपल्या जातीच्या लेकरांसाठी तुम्ही साथ द्या’, असे कळकळीचे आवाहन करीत ‘माझा जीव गेला तरी चालेल पण आरक्षणाशिवाय एक इंचही मागे हटणार नाही’ असा पुनरूच्चार मनोज जरांगे पाटील यांनी आज येथे केला.(manoj jarange appeal to Support our community jalgaon news )

शहरातील चाळीसगाव महाविद्यालयाच्या ट्रॅक ग्राऊंडवर रविवारी (ता.३) दुपारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. वीर मातांच्या हस्ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील यांचा सकल मराठा समाजातर्फे कोअर कमेटीने जाहीर सत्कार केला.

श्री. जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या एकजुटीमुळे आपले आरक्षण आता अंतिम टप्प्यात आले आहे. आम्ही हक्काचे आरक्षण मागत आहोत. साडेतीन लाख नोंदी जळगाव जिल्ह्यात सापडल्या आहेत. आरक्षण मिळाले तर आयुष्याची भाकरी मिळणार आहे. आता ही संधी असून संधीचे सोने करा.

यात तुमचा किंवा माझा फायदा नसून घराघरातील मराठा समाजाचा फायदा आहे. मी मराठ्यांच्या लेकरांसाठी जिवाची बाजी लावली. आरक्षण घरी कोणी आणून देणार नाही, त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून अनेक जण षडयंत्र करीत आहेत. टोळ्याच्या टोळ्या मराठ्यांच्या विरोधात आल्या तरी मराठे पुरून उरतील.

मराठ्यांचे पोरं संपले तर मराठ्यांची जात संपेल असा विचार करणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, कोणी कितीही काहीही केलं तरी त्याची चिंता तुम्ही करू नका मी खंबीर आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला. देशातील अनेक आंदोलनांचा अभ्यास मी केला असून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व त्यांच्या गनिमी काव्याची जोड दिली आहे.

आम्ही आरक्षणाचे सर्व निकष पार केले तरी आम्हाला अजून आरक्षण मिळालेले नाही. मराठ्यांना ‘ओबीसी’मधूनच आरक्षण मिळणार, कोणीही आडवा आला तरी त्याला घाबरू नका असे त्यांनी सांगितले. भाग्यश्री तुपे व जयश्री रणदिवे यांनी सूत्रसंचालन तर गणेश पवार यांनी आभार मानले.

अनेकांकडून सत्कार, पुष्पवृष्टी

मनोज जरांगे पाटील यांचे शहरात आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदी येथील सकल मराठा तरुणांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

रांजणगावच्या मराठा समाजातर्फे माजी सैनिकांतर्फे फौजी ढाबा व नागद चौफुली येथे मराठा समाज व मुस्लिम समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात माजी नगरसेवक रोशन जाधव व मित्र परिवाराने त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. दुपारी सभा असतानाही मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT