two gut fight two gut fight
जळगाव

मुलीला अश्‍लिल हावभाव; जामनेरात तणाव, दगडफेकीत एकजण जखमी

मुलीला अश्‍लिल हावभाव; जामनेरात तणाव, दगडफेकीत एकजण जखमी

सकाळ डिजिटल टीम

जामनेर (जळगाव) : मुलीच्या छेडखानीचा ( gestures to the girl) प्रकार गुरूवार रात्री नऊ-दहाच्या सुमारास घडला. यामुळे जामनेर शहरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. दरम्यान अज्ञात व्यक्तींद्वारा परीसरामध्ये दगडफेकही करण्यात आल्याने त्यात एकाला दुखापत झाल्याचे पोलीसांनी सांगीतले. विशाल पवार असे जखमी झालेल्याचे नाव आहे. (Obscene gestures to the girl tensions in Jamner)

सदर घटनेतील फिर्यादी अलका भिवा मोरे (रा. गणेशवाडी) यांची मुलगी घराच्या मागील बाजुस भांडी घासत असतांना संशयीत आरोपीने छेडखानीच्या दृष्टीने मुलीला अश्लील हाव- भाव केले. त्यामुळे मुलीने आरडा- ओरड केली. यानंतर जमा झाली होती. याचदरम्यान कोणीतरी दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे पथकासह तेथे आले. त्यांनी परीस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सामाजीक कार्यकर्ते जितु पाटील, नगरसेवक महेंद्र बावीस्कर, आत्माराम शिवदे, न्याजुसेठ लकडावाले, अनीस शेख, जावेद शेख, रिजवान शेख, बंडु माळी आदीही पोहचले. त्यांनी दोघा बाजुंच्या लोकांना समजावून सांगत घटनास्थळावरून पांगविले.

पोलीस अधिक्षक शहरात दाखल

घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे, तहसीलदार अरूण शेवाळे यांनी स्थानिक पोलीस प्रमुखांकडुन माहिती घेऊन सामाजिक तणाव वाढू नये यासाठी दोन्ही समाजातील नागरीकांना आवाहन केले. घटनेबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन याप्रकरणी सध्यातरी संशयीत आरोपी म्हणुन मुजीब खान असलम खान (वय १४) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

समाजकंटकांना पाठीशी घालु नका : डॉ. मुंडे

दोन घरातील वादाचे रूपांतर दोन गटामधे होणे चुकीचे असुन, कोणीही घटनेला सामाजिक रंग देऊ नये. समाजात विध्नसंतोषी लोक असताच अशा समाजकंटकांना पाठीशी घालणे चुकीचे असल्याचे मत पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केले. आज सकाळी अकराच्या सुमारास डॉ. मुंडे यांनी दोन्ही समाजातील प्रमुख लोकांची बैठक पोलीस ठाण्यात बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. तरूण मुलांवर घरातील मोठ्यांनी नियंत्रण ठेवावे. कोणत्याही किरकोळ घटनेवर तणाव वाढुन त्याचे दगडफेकीत रूपांतर होणे बेजबाबदार पणाचे लक्षण असुन काही झाले की रस्त्यांवर येणेही बंद झाले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT